• Wed. Sep 9th, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 28, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा – महासंवाद

नवी दिल्ली, २८ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत प्रधानमंत्र्यांसोबत चर्चा केली.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत प्रधानमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस कालपासून दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या समवेत काल ऊस आणि कांदा उत्पादकांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच राज्यातील सिंचन प्रकल्प, जलजीवन मिशनची कामे आदींबाबत महत्त्वपूर्ण बैठका झाल्या होत्या.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed