• Sun. Jun 7th, 2026

    Shrikant Shinde Accident : बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चार गाड्या एकमेकांना धडकल्या, खा. श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

    Shrikant Shinde Accident : बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चार गाड्या एकमेकांना धडकल्या, खा. श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

    Nanded MP Shrikant Shinde Accident : नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय.

    खासदार श्रीकांत शिंदे गाडी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नांदेड दौऱ्यावर आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार Shrikant Shinde आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला. ताफ्यासमोर अचानक दुचाकी आल्यानं चार गाड्या एकमेकांना आदळल्या. आज गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे. नायगाव येथील बैठकीला जात असताना हा अपघात घडला.

    नेमकं काय घडलं?

    खासदार श्रीकांत शिंदे हे राज्यभर शिवसंवाद दौरा करत आहेत. काल बुधवारी रात्री शिंदे यांचं नांदेडमध्ये आगमन झालं. यावेळी त्यांनी नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी नायगाव येथे बिलोली, देगलूर आणि मुखेड या तीन विधानसभा मतदार संघाची बैठकीचे आयोजन करण्यात आलं. या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी हे नायगावकडे रवाना झाले.

    Maharashtra TimesAhilyanagar Accident : सुट्टीत मामाच्या गावी, खेळत असताना काळाची झडप, भरधाव ट्रॅक्टर अंगावर कोसळलं; मामासह दोन्ही भाच्यांचा करुण अंत

    बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात अपघात

    अण्णाभाऊ साठे चौकमार्गे त्यांचा ताफा जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर अचानक एक दुचाकी आली, त्यानंतर ताफ्यातील एका वाहन चालकानं वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावला. त्यानंतर पाठीमागील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातात एकवढा भीषण होता की चारही वाहनांचं मोठं नुकसान झालं. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये काही कार्यकर्ते आणि आरोग्य विभागातील काय कर्मचारी होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा