• Sat. Jun 6th, 2026
    Solapur Crime : सासरचा छळ असह्य, दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन आयुष्य संपवलं, आधी लेकराची बॉडी सापडली नंतर आईची

    Solapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, सोलापुरात एक भीषण घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    सोलापूर आईची मुलासह आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कौटुंबिक छळाला वैतागून एका विवाहित महिलेनं दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मैंदर्गी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या आईने सासरच्या सात जणांविरोधात संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय 30, रा. मैंदर्गी) या महिलेनं आपला मुलगा शिवराज सिद्धप्पा कट्टीमनी (वय 2 वर्ष) याला घेत मंगळवारी दुपारी तोरणी रोडलगत असलेल्या विहिरीत आपल्या मुलासह उडी घेत आत्महत्या केली आहे. भाग्यश्रीने आत्महत्या केल्याची माहिती तत्काळ तिच्या नातेवाइकांनी माहेरी कळविली.

    सुरुवातीला शिवराजचा मृतदेह आढळला

    मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच भाग्यश्रीची आई कलव्वा बसप्पा पुजारी (रा. भोसगा पुजारी, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) या नातेवाइकांसह तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने विहिरीतून प्रथम दोन वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. याचदरम्यान भाग्यश्रीचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिलाही मृत घोषित केले.
    Maharashtra TimesMumbai News : 17 व्या वर्षी घरातून पळाला, रस्त्यावर भीक मागत 10 वर्ष ढकलली, मुंबई पोलिसांमुळे कुटुंबाशी पुनर्मीलन, मायलेक गळ्यात पडून रडले

    कौटुंबिक छळातून आत्महत्या केल्याची फिर्याद

    मृत भाग्यश्रीच्या आईने दिलेल्या जबाबात, मुलीचा सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तिपव्वा कट्टीमणी, शरणप्पा कटीमणी, सिद्धप्पा कट्टीमणी, समर्थ कट्टीमणी, नागनाथ कट्टीमणी, गगव्वा पुजारी आणि यालप्पा कट्टीमणी यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासू, सासरे, पती, दोन दीर, नणंद आणि अन्य नातेवाईक यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार अमोल माने करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा