• Tue. Jun 16th, 2026
    Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

    Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike : ‘कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर आपण आपली कदर का करायची’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

    अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत, 30 मे पासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. देशात कुठेच झालं नाही, असं कठोर उपोषण करणार असल्याचं स्पष्ट करताना जरांगे-पाटील यांनी ‘उष्माघातानं बळी गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल’, असा इशारा दिला. उपोषणादरम्यान, मराठा समाजातील बांधवांनी अंतरवाली सराटीकडे येऊ नये’, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

    मनोज जरांगे काय म्हणाले?

    काही दिवसापूर्वी मनोज जरांगेंनी आमरण उपोषणाची घोषण केली होती. त्यानंतर, भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, ‘मी येत्या 30 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. देशात कुठेच असं झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
    Maharashtra TimesMLC Election: विधानपरिषदेच्या तीन जागांवरून महायुतीत संघर्ष, वाद थेट अमित शहांपर्यंत गेला; नाशिकसह आणखी कोणत्या दोन ठिकाणी चढाओढ?
    ‘चर्चेसाठी वेळ दिला आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. उष्माघातानं बळी गेला तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार जबाबदार असेल. सरकारचा नाहीतर माझा तुकडा पडेल. सरकारला आता वेळ तरी किती देऊ? उपोषणात पाणी, अन्न, चप्पल साऱ्या गोष्टींचा त्याग करणार आहे. मराठा समाजाच्या मुलांचा सरकारने उन्हाळा केला. देशात कुठेच झालं नाही असं कठोर उपोषण मी करणार आहे’, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

    मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही

    ‘मराठ्यांती मतं तुम्हाला हवीत, पण आरक्षण दिलं जात नाही. राज्यभरात मराठा तरुणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपोषणात मेलो तर मेलो तरी चालेल. बलिदान गेलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार अद्याप नोकरी देईना. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? तीन लाख कुणबी प्रमाणपत्र दिले म्हणता, उपकार केले का?’ असा संतप्त सवालही जरांगे पाटील यांनी केला आहे.
    Maharashtra TimesABMCM Election: वर्षा उसगावकर, शिंदे, खोचीकर बिनविरोध? चित्रपट महामंडळ निवडणुकीत आज माघारीचा दिवस
    पुढे ते म्हणाले की, ‘मला आता आरपारची लढाई लढायची आहे. सगळ्या मागण्या सांगितल्या, सर्व समजून सांगितलं तरी आरक्षण नाही. प्रेमानं सांगितलं, मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही. मराठ्यांची लेकरंबाळं अधिकारी झाली पाहिजेत’, असंही ते म्हणाले. ‘पश्चिम महाराष्ट्रात सधन, फळबागा आहेत म्हणता, ओबीसीकडेही आहेत. सधन आणि फळबागा हा काय आरक्षणाचा निकष आहे का?’, असं मनोज जरांने पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. आता त्यांच्या या आमरण उपोषणाला सरकार काय उत्तर देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा