• Wed. Jun 17th, 2026
    Aaditya Thackeray: पक्ष फोडणे हा भाजपचा गलिच्छ डाव; अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरे काय म्हणाले?

    Aaditya Thackeray Pune: आदित्य ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या (ठाकरे) शहर व जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    aaditya thackeray.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : देशात सत्तेचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. सत्तेच्या हव्यासापोटी आणि दोन तृतीयांश बहुमतासाठी विरोधी पक्ष फोडणे, चिन्हे आणि नावे चोरणे हा भारतीय जनता पक्षाचा गलिच्छ डाव आहे,’अशी टीका शिवसेना (उबाठा)चे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. मशाल चिन्हावर निवडून आलेले सर्व आमच्यासोबतच आहेत, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

    तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी वेगळा गट करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात शिवसेनेचा खटला जवळपास आता चार-साडेचार वर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही खटला सुरू आहे. मात्र, एखादा पक्ष फुटतो. पक्षाचे नाव चोरले जाते आणि निवडणूक आयोग त्यांना निवडणूक चिन्ह (सिम्बॉल) देते, ही खूप मोठी गोष्ट आहे.

    आंदोलन मागे, तरी फडणवीस सरकारला घाम फोडला! कर्जमाफीसाठी रोहित पवार ठाम

    जगात मोठी असलेली देशातील लोकशाही या प्रकारामुळे नष्ट होत आहे,’ असे ठाकरे म्हणाले. भाजपचे हे गलिच्छ राजकारण केवळ पक्षांना नव्हे, तर देशाच्या संविधानाला घातक ठरत आहे, असेही ते म्हणाले.

    Maharashtra TimesPune Crime : बँकांनी जप्त केलेल्या डीएसकेंच्या आलिशान कार स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यातील एजंटकडून तरुणाची फसवणूक
    सर्व खासदार संपर्कात
    उद्धव ठाकरे यांनी पक्षाबरोबर असणाऱ्या सर्वांच नेहमीच विश्वास दर्शविला आहे. जे मशाल चिन्हावर जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत, ते सर्व आमच्यासोबत उभे आहेत. कौटुंबिक अडचणींमुळे काही जण बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी ते आमच्या संपर्कात होते. शिवसेनेचे सात खासदार संपर्कात असल्याच्या कृपाल तुमाने यांच्या दाव्यावर तुमाने यांनी पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.

    उबाठा पक्षाकडून आमदारांची बैठक
    येत्या सोमवारी (२२ जून) दुपारी चार वाजता मंत्रालयासमोरील ‘शिवालय’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ पक्षाच्या विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस सर्व सन्माननीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे पत्र पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या सहीने काढण्यात आले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा