• Mon. Jun 15th, 2026
    Shrikant Shinde: सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा! ‘युती’बद्दल चर्चा न करण्याचे श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

    Shrikant Shinde: सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा, तसेच ‘युती’बद्दल चर्चा न करण्याचे श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. काय म्हणाले नेमकं?

    shrikant shinde(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युती होईल अथवा नाही याची चर्चा करू नका. सर्व ठिकाणी सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा. कमिट्यांवर नियुक्त्या नाहीत, आमच्या भागात मंत्री, आमदार, खासदार नाहीत, या तक्रारीत काही अर्थ नाही. लोकांचे प्रश्न आणि समस्या असतील; तर त्या सोडविण्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, तीच खरी राजकीय पक्षाची ताकद असते,’ असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. ते शिवसंवाद दौऱ्यात बोलत होते.

    ‘एका अत्यंत सामान्य घरातील महिला कार्यकर्त्याला थेट राज्यसभेत जाण्याची संधी शिवसेनाच देऊ शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी संधी येण्याची शक्यता शिवसेनेतच असल्याचे,’ डॉ. शिंदे म्हणाले.

    Maharashtra TimesNagpur News : इबोला संदर्भात प्रशासन सतर्क; युगांडाहून नागपुरात आलेल्या संशयित व्यक्तीवर आरोग्य विभागाची नजर
    ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढू आणि आम्ही संपूर्ण मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात भगवा फडकवू,’ असे खासदार संदीपान भुमरे म्हणाले.

    ‘जालना जिल्ह्यात शिवसेनेत सर्वाधिक एकता आहे. कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याने निवडणुका जिंकण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत,’ असे आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

    Maharashtra TimesEknath Shinde : ‘मी दिल्लीत आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले’, उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
    मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम केले
    ‘मनोज पाटील जरांगे यांच्या बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकार सकारात्मक आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. जरांगे यांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देण्याचे काम सरकारने आतापर्यंत केले असून, यापुढेही करेल,’ असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    शिवसेना शिंदे गटात धडधड
    नाशिकच्या जागेवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना चांदवडमधून भाजपचे नेते भूषण कासलीवाल यांनीही विधान परिषदेसाठी अर्ज घेतला आहे. कासलीवाल यांनी थेट गुजरात ‘कनेक्शन’ वापरले आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही नाशिकचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरची जागा मिळाल्यास भाजपला नाशिकची जागा मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात धडधड वाढली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा