Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: भविष्यात अशा प्रकारची भाषा वापरल्यास भाजप कार्यकर्ते त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी यावेळी दिला.
बुधवारी नागपुरात बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात करण्यात आलेली टीका ही अश्लील, नीच आणि नालायकपणाची आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली राजकीय उंची आणि आपण कोणाविरोधात बोलत आहोत, याचे भान ठेवावे. यापुढे त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याविरोधात अशा प्रकारची भाषा वापरली, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा वक्तव्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण होऊ शकतो’, असा इशाराही त्यांनी दिला.
Nagpur News : इबोला संदर्भात प्रशासन सतर्क; युगांडाहून नागपुरात आलेल्या संशयित व्यक्तीवर आरोग्य विभागाची नजर
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोवंश कत्तलीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. गोहत्या करणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत राज्यातील सर्व पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘एसआयआर’ प्रक्रियेचे समर्थन करताना बावनकुळे म्हणाले, ‘मतदारयाद्यांमध्ये एकाच व्यक्तीची अनेक नावे असल्याच्या तक्रारी आहेत.
एसआयआरमुळे मतदारयादी शुद्ध आणि पारदर्शक होईल. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ओबीसी कॅबिनेट सबकमिटी’ची बैठक नुकतीच पार पडल्याची माहिती देत बावनकुळे म्हणाले, ‘राज्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी सरकार घेईल.’
Nagpur | सीएमकडे तक्रार केल्यानं विद्यार्थिनीला रुम सोडण्याची नोटीस, बावनकुळेंचा फोन, काय घडलं?
महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत ९९ टक्के चर्चा पूर्ण झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये अंतिम चर्चा होऊन उद्यापर्यंत अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी दिल्ली बैठकीची आवश्यकता नसून राज्यातील प्रमुख नेते परस्पर चर्चेतून निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
