• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai Crime: मुंबईतील हायप्रोफाइल इमारतीत फ्लॅटमधून उग्र वास; पोलिस तपासात गूढ उकललं, मैत्रिणीसह तरुणाचा भलताच ‘उद्योग’

    Mumbai Crime: मुंबईतील हायप्रोफाइल इमारतीत फ्लॅटमधून उग्र वास; पोलिस तपासात गूढ उकललं, मैत्रिणीसह तरुणाचा भलताच ‘उद्योग’

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील ‘यास्मीन टॉवर’ या २३ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर ड्रग्जची प्रयोगशाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या इमारतीमधील फ्लॅटमध्ये छापा टाकून एका बांगलादेशी महिलेसह तिघांना अटक केली आहे.

    शोएब मन्सुरी (३१), सुफियान मन्सुरी (२८) आणि मामुनी सरकार (२७) अशी आरोपींची नावे आहेत. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार करून बाजारात विक्री केली जात होती. या फ्लॅटमधून ५१ कोटी रुपयांचा कच्चा माल, एमडी ड्रग्ज तसेच पिस्तुल आणि १९ काडतुसांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. फ्लॅटच्या स्वयंपाकगृहामध्ये प्रयोगशाळेप्रमाणे युनिट उभारून एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याचे आढळले.

    अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे, सहायक निरीक्षक उल्हास खोलम यांचे पथक ड्रग्जविरोधी कारवाई करीत असताना त्यांना आग्रीपाडा येथे एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी जगदाळे यांच्या पथकाने ‘यास्मीन टॉवर’मध्ये छापा टाकला. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल तसेच इतर पदार्थ सापडले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोएब याच्यासह त्याची मैत्रीण मामुनी आणि सुफियान यांना पोलिसांनी अटक केली.

    ड्रग्जसाठी भाड्याने घर

    शोएब आणि त्याचे साथीदार हे दक्षिण मुंबईतील नळ बाजार तसेच परिसरातील आहेत. ड्रग्ज तयार करण्यासाठी त्यांनी खास भाड्याने फ्लॅट घेतला होता. सुमारे ४५ हजार रुपये दर महिना भाडे दिले जात होते. फ्लॅट मालकाने याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात दिली होती का, याबाबतची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    एसी, धूप आणि कापूर

    एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल आणि इतर पदार्थांचा वास उग्र असून, त्याच्या संपर्कात आल्यास डोळ्यांनाही त्रास होतो. ‘यास्मीन टॉवर’ ही रहिवाशी वस्तीची इमारत असल्याने फ्लॅटबाहेर कुणाला वास जाऊ नये, यासाठी हे तिघे कायम एसी सुरू ठेवत. उग्र वास दरवळू नये, यासाठी फ्लॅटमध्ये धूप आणि कापराचा धूर केला जात असल्याचे सांगितले जाते.

    दबदब्यासाठी शस्त्रेही बाळगली

    शोएब याच्या विरोधात सोनसाखळी चोरी, जबरी चोरी तसेच इतर असे २१ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ड्रग्जची निर्मिती आणि विक्री करताना आपला दबदबा राहावा, यासाठी त्यांनी पिस्तूल आणि काडतुसे बाळगली होती. शस्त्र आणि काडतुसे कुठून आणली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed