नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या मनीषा मांढरे, तर सेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मनीषा हवालदार यांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे नामांकित शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची चौकशी सुरू आहे. यातील काही विषयतज्ज्ञांनी सीईटी सेलसाठी काम केले असून, काही अजूनही सक्रिय आहेत. या कामाच्या अनुभवावरच संबंधित विषयतज्ज्ञांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून (एनटीए) घेण्यात येणाऱ्या नीट, जेईईसारख्या प्रवेश परीक्षांच्या कामाची संधी मिळाली. मात्र, तेथे गैरप्रकार केल्याने यंदा नीट पेपरफुटीच्या घटना घडल्या.
Devendra Fadnavis: पुण्यात 400 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार, एक हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती
यंदाच्या नीट पेपरफुटीचे केंद्र हे पुणे असून, विविध नामांकित कॉलेजांमधील प्राध्यापकांची चौकशी होत आहे. यातील काहींनी सीईटी सेलच्या परीक्षा विषयक कामात विषयतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. त्यामुळे या तज्ज्ञांकडून सीईटी सेलकडून घेण्यात आलेल्या परीक्षांमध्येही गैरप्रकार करण्याच्या शक्यतेबाबत शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे.
यातील विषयतज्ज्ञ बंदी असतानाही खासगी शिकवण्यांमध्ये विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित अशा प्रमुख विषयांचे मार्गदर्शन करीत होते. या पार्श्वभूमीवर सीबीआयने सीईटी सेलच्या अनुषंगानेही तपास करावा, अशी मागणी आहे. काही दिवसांपूर्वी एनएसयूआच्या वतीने अक्षय कांबळे यांनी संबंधित विषयतज्ज्ञांबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दिली आहे.
Baramati News : बायकोला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कोट्यवधींची फसवणूक करणारा सिनेस्टाईल जेरबंद
सीईटी सेलचे मौन
पीसीएम सीईटीचा निकाल २० मेपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली होती. मात्र, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे पीसीएम सीईटीचा निकाल रखडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यााबाबत सीईटी सेलकडून प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तसेच सेलच्या विषयतज्ज्ञांबाबत माहिती घेण्यासाठी सरदेसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. सीईटी सेलच्या जनसंपर्क कक्षानेही विषयतज्ज्ञांविषयी प्रतिक्रिया देता येणार नसल्याचे सांगितले, तर पीसीएम सीईटीचा निकाल लवकर जाहीर करू, असे सांगण्यात आले.
