Nashik Trimbakeshwar News : नाशिकमधील त्र्यंबकेश्ववरमधील मंदिराचा कोट मोकळा चिरा निखळून पडला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
त्र्यंबकेश्वर मंदीर भाग कोसळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या नावाखाली शहरातील प्राचीन वारसा धोक्यात येत असून, कुशावर्तासह शहरातील प्राचीन तलाव तोडफोडीच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप नागरिक व वारसाप्रेमींनी केला आहे. त्याचबरोबर दर्शनपथासाठी त्र्यंबकराज मंदिराचा कोट मोकळा चिरा निखळून पडल्याने चिंता व्यक्त होत आहे.
बांधकामांचा वारसा
हजार वर्षांहून अधिकचा इतिहास लाभलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये शिलाहार-राष्ट्रकूट कालखंडातील मंदिरांचे अवशेष, संत निवृत्तिनाथ महाराजांची संजीवन समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श, तसेच नानासाहेब पेशवे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळातील बांधकामांचा वारसा आहे. अशा शहरात तलावांच्या दगडी काठांची मोडतोड सुरू असल्याने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व राज्य पुरातत्त्व विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. Rohit Pawar : भ्रष्टाचाराची लवकरच पोलखोल! आमदार रोहित पवारांचा मंत्री गिरीश महाजनांना इशारा, रिंगरोड विरोधात प्रकरण तापणार शहरातील तलावांवरील दगडी नक्षीदार चिरे काढून टाकून त्याजागी यंत्रावर घासलेले नवे दगड बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही जुन्या दगडांवर नक्षीबरोबर मजकूरही असल्याचे सांगितले जाते; मात्र त्यांचा अभ्यास, नोंदणी किंवा जतन करण्याची प्रक्रिया होत नसल्याची तक्रार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत असून कुशावर्त तीर्थ, बल्लाळेश्वर मंदिर आणि इंद्राळेश्वर तीर्थ हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत; मात्र शहरातील अनेक तलाव असंरक्षित यादीत असल्याने त्यांच्यावर थेट हस्तक्षेप होत असल्याचे चित्र आहे. कुंभमेळा प्राधिकरणाने गौतमी बेझे धरणाचे पाणी तलावांत सोडण्याच्या उद्देशाने संवर्धन हाती घेतले असले, तरी वारसामूल्यांचा पुरेसा विचार झाला नसल्याचा आरोप होत आहे. Nashik News : शेतकऱ्यांनी जगावं कसं? रखरखत्या उन्हात हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन, कांद्याचा मुद्दा तापला; विरोधक आक्रमक
वारसा जतनाकडे दुर्लक्ष
दर्शनपथासाठी मंदिरालगतची दुकाने हटवताना जेसीबीचा वापर झाल्याने सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या मंदिराच्या कोटाच्या भिंतीचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रीय संरक्षित स्मारकापासून १०० मीटर परिसरात खोदकाम-बांधकामास मनाई असताना दर्शनपथाचे काम कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील १५० ते ३०० वर्षांहून जुने वाडे व इमारतीही दुर्लक्षित असल्याचे चित्र असून, त्र्यंबकेश्वरला ‘हेरीटेज’ घोषित करण्याच्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात वारसा जतनासाठी ठोस पावले दिसत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा