• Sun. Jun 14th, 2026

    Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! अप्पर वैतरणाने गाठला तळ; अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक, इतर धरणांची काय स्थिती?

    Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! अप्पर वैतरणाने गाठला तळ; अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक, इतर धरणांची काय स्थिती?

    Mumbai Dam Water Level: कमी पावसाचा अंदाज, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेली दहा टक्के पाणीकपात आणि राखीव पाणीसाठ्याच्या मंजुरीनंतरही मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.

    मुंबई धरण पाणीपुरवठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोठी पाणीसाठवण क्षमता असलेल्या अप्पर वैतरणा धरणाने तळ गाठला आहे. या धरणात अवघा पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून अवघे १८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

    मुंबईला मोडक सागर , तानसा, मध्य वैतरणा , विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची पाणीसाठवणक्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. यातून दररोज तीन हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या सातही धरणांत एकूण दोन लाख ६३ हजार ३३७ दशलक्ष लिटर म्हणजेच १८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी सातही धरणे मिळून याच तारखेला १६ टक्के तर, सन २०२४ मध्ये १० टक्के पाणीसाठा होता.

    Maharashtra Timesदादरमधील डॉक्टर ब्रिटनमध्ये महापौर; डॉ. नितीश राऊत यांच्याकडे ‘सटन कोल्डफिल्ड’ची धुरा
    या धरणांपैकी मोठे धरण असलेल्या अप्पर वैतरणा धरणाचे पाणी पाच टक्क्यांपर्यंत घसरले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १२ टक्के पाणीसाठा होता. सात धरणांपैकी अप्पर वैतरणा आणि भातसा धरण ही दोन्ही धरणे राज्य सरकारच्या अखत्यारित असून उर्वरित पाच धरणे मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहेत. अप्पर वैतरणा आणि भातसा धरणांतील अनुक्रमे ९० हजार दशलक्ष लिटर आणि एक लाख ४७ हजार ९२ दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली आहे. मात्र सातही धरणांतील पाणीसाठा दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी झाल्यानंतरच या राखीव पाणीसाठ्याचा वापर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    Maharashtra Times‘भारत याचक म्हणून गेला नाही’; Devendra Fadnavis यांनी सांगितली आंतरराष्ट्रीय घडामोडींची इनसाईड स्टोरी
    महापालिकेच्या आवाहनाला तिलांजली
    यंदा १५ नेपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून मुंबईकरांना पार्ण जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र या आवाहनानंतरही मुंबईकरांनी या आवाहनाला तिलांजलीच देत असल्याचे दिसते आहे. वाहने धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. हॉटेलांमध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेवढेच पेल्यांमध्ये पाणी द्यावे, अथवा पाण्याची बाटली पुरवावी, जेणेकरून अकारण पाग्याने भरून ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तरीही याकडे हॉटेलमालक आणि ग्राहक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

    उर्वरित सहा धरणांतील शिल्लक पाणीसाठा
    मोडक सागर – ३४ टक्के
    तानसा – १३ टक्के
    मध्य वैतरणा – २४ टक्के
    भातसा -१७ टक्के
    विहार -४८ टक्के
    तुळशी -२९ टक्के

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा