म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरातील अतिक्रमणे हटवल्यानंतर, आता पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोरेगाव आणि मालाडदरम्यान ६० अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे १५०० चौरस मीटर जागा पुन्हा रेल्वेच्या ताब्यात आली असून यामुळे हार्बरच्या विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.
गोरेगावपर्यंत हार्बर मार्ग विस्ताराचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडला आहे. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणांमुळे प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नव्हती. आता अतिक्रमणे हटविण्याची मोहीम वेगाने राबविण्यात येत असल्याने भविष्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. गोरेगाव-मालाडदरम्यान पूर्वेला किमी २८/३ ते २८/६ या भागात रेल्वेच्या मालकीच्या सुमारे एक हजार ५०० चौरस मीटर जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. या जागेवर उभारलेल्या ३६ पक्क्या आणि २४ तात्पुरत्या बांधकामांवर रेल्वे प्रशासनाने बुलडोझर चालवला. यापैकी २६ पक्की बांधकामे हटविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित अतिक्रमणांवरही टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू राहणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरात पश्चिम रेल्वेने मोठी अतिक्रमणांविरोधात व्यापक कारवाई केली होती. त्यानंतर आता गोरेगाव-मालाड भागातील कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणांविरोधातील भूमिका आणखी आक्रमक केल्याचे स्पष्ट झाले आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोरेगाव, मालाडमध्ये ६० अतिक्रमणांवर कारवाई – एकूण १५०० चौमी जागा मोकळी – वांद्रेनंतर गोरेगाव, मालाडमध्ये पाडकाम – मार्गाच्या विस्तारात अतिक्रमणांचे अडथळे
कारवाईसाठी तैनात यंत्रणा शहर पोलिस- १६८ रेल्वे सुरक्षा दल- २५ रेल्वे पोलिस- ६५ रेल्वे कर्मचारी- ८० जेसीबी- ३ डम्पर- ३
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा