Nashik Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आज मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. नाशिकच्या जागेची मागणी ते करणार असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकची जागा महायुतीत कोणाला, याचा अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील इच्छुकांनी मुंबई, जळगाव वाऱ्या सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेतल्याने भाजपसह ‘मविआ’तील इच्छुकात चुरस वाढली आहे.
Nashik News: दहा कोटींचा खर्च वाया; रिंगरोडसाठी खोदले दोन वर्षांपूर्वी बनविलेले सर्व्हिसरोड
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असला तरी, नाशिकसह परभणी, छत्रपती संभाजीनगर, ठाणे या चार जागांचा पेच कायम आहे. त्यामुळे जागावाटप जाहीर होत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यात जळगावच्या बदल्यात नाशिकची जागा भाजपकडे येणार म्हणून पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.
जळगाव आणि नाशिकच्या जागेत अदलाबदल होणार असल्याच्या चर्चेने काही इच्छुक जळगावला गेल्याची चर्चा आहे. तर, काही मुंबईत ठाण मांडून आहेत. शिवसेनेतील इच्छुक मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
Nashik Crime: महिलांच्या टोळीने लुटले वृद्धेचे दागिने; पिण्याच्या पाण्यातून दिले गुंगीचे औषध, नाशिक जिल्हा रुग्णालयाबाहेरील घटना
केदा आहेरही रिंगणात
भाजपमध्ये गणेश गिते, नीलेश बोरांसह डझनभर इच्छुक असतानाच, डॉ. आहेरांचे बंधू आणि ‘नाफेड’चे संचालक केदा आहेर यांनी विधानपरिषदेसाठी उडी घेतली आहे. आहेर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज घेत भाजपसह अन्य इच्छुकांना धक्का दिला आहे. आहेर यांचे सर्वपक्षीय संबंध लक्षात घेता आहेर हे अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीही त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
