Dhule Laling Ghat Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अशातच धुळ्यातील लळिंग घाटात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच निष्पापांचा बळी गेला आहे.
लळिंग घाट अपघात पाच जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे शहराजवळील लळिंग घाट परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण आणि तितकाच विचित्र तिहेरी अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घाटामध्ये वाहतूक कोंडी झाल्यानं एका वाळूच्या डंपर चालकाने आपला डंपर चुकीच्या बाजूने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकला या डंपरने जोरदार धडक दिली.
बचावकार्य सुरु असताना तिसऱ्या वाहनाची धडक
या अपघातानंतर मदतकार्य सुरू असतानाच, मध्य प्रदेशहून आलेल्या एका भरधाव प्रवासी ट्रॅव्हल्स बसने अपघातग्रस्त ट्रक आणि डंपरला मागून जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यात ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांचा समावेश आहे. तसेच, या अपघातात 10 ते 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. Raigad Accident: साताऱ्यातून स्कॉर्पिओने कोकणात फिरायला गेले, रात्रीच्या अंधारात घात; आंबेनळी घाटातील मृत 8 तरुणांची नावे समोर
आंबेनळी घाटात भीषण अपघात
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळील आंबेनळी घाट येथे काल रविवारी रात्री भीषण अपघात झाला. पर्यटकांची स्कॉर्पिओ गाडी दांभिल टोकाजवळ अनियंत्रित होऊन सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू झाला. मृत सर्वजण सातारा जिल्हा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे समोर आली आहे. वीकेंड संपवून परतताना घाटातील तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. NEET Paper Leak: मनीषा हवालदारच्या CBI चौकशीत धक्कादायक खुलासे; पुण्यातील आणखी एका तज्ज्ञ प्राध्यापिकेचं नाव घेतलं, व्याप्ती वाढली!
रात्रीचा अंधार, खोल दरी आणि दुर्गम परिसरामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि सिस्केप रेस्क्यू टीम यांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम सुरू होती. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. दरम्यान, 2018 मध्ये याच परिसरात कोकण कृषी विद्यापीठ बस दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाला होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा