मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारविरोधात जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी एल्गार पुकारला आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. जरांगेंना भाऊ म्हणत अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा आपुलकीची भावना व्यक्त केली आहे. याआधीही जरांगे पाटील माझे भाऊ आहेत असं म्हणत त्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर जरांगेंनीही भाऊबीजेला साडीचोळी घेऊन बहिणीकडे जाणार, असा प्रतिसाद दिला होता. तर आता जरांगे मुंबईत आले, तर त्यांचं स्वागत करेन, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.