• Tue. Sep 15th, 2026

Latur Educational Institution Director Ends Life : लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे यांचे डोक्यात गोळ्या झाडून आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे.

लातूर शैक्षणिक संस्थेच्या मालकाची आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर शहर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून खासगी शिकवणीमुळे अनेक महाविद्यालयांना उतरती कळा लागली आहे. यामुळे अनेक संस्थाचालक दिवसेंदिवस अडचणी येत आहेत. याच उदविघ्नतेतून आज लातूर शहरातील सुप्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी स्वत: डोक्यात गोळी झाडून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.

राहत्या घरीच आयुष्य संपवलं

शैक्षणिक क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’ची अनेकदा चर्चा होते. लातूरमध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीमुळे लातूर चर्चेत असतानाच आता लातूरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणेयांनी डोक्यात गोळ्या झाडून आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. 62 वर्षीय सोनवणे यांनी शहरातील पद्मानगर भागातील राहत्या घरीच त्यांनी जीवन संपवलं.

Maharashtra TimesRohit Pawar: जरांगे पाटलांना परवानगी नाकारणं चुकीचं, आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार; रोहित पवारांनी सरकारला काय आवाहन केलं?

मृत्यूपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं?

संजीव चंद्रभानू सोनवणे यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहिल्याची माहिती समोर आली आहे. ‘आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये’, असं संजीव सोनवणे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसांना देखील आवाहन केलंय. ‘माझ्या आत्महत्येचा तपासही करू नये’, असंही संजीव सोनवणे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहिलं होतं. या घटनेनंतर पद्मानगर भागात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

मित्रपरिवाराने सांगितलं खरं कारण

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, घटनेचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. सोनवणे यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचं कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अधिकृत पोलीस तपासानंतरच घटनेबाबतची संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’चे प्रतिनिधी यांनी त्यांच्या मित्रपरिवाराशी चर्चा केली असता घटनेचं खरं समोरआलं आहे. खासगी शिकवणीमुळे अनेक महाविद्यालयांना उतरती कळा लागली असल्यामुळे संजीव सोनवणे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितलं आहे. सोनवणे यांच्या सोलापूर, लातूर आणि येडशी याठिकाणी शिक्षणसंस्था आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा