विशेष म्हणजे, हे दोन्ही रस्ते पूर्णतः खणून काढण्यात आले असून, संपूर्ण रिगरोड देखील वीस मीटर पूर्वेस सरकविण्यात आला आहे. परिणामी, संपूर्ण दहा कोटीचा खर्च वाया गेला असून, पालिका आयुक्तांच्या नजरेत हा प्रकार का आला नाही, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Nashik Crime: महिलांच्या टोळीने लुटले वृद्धेचे दागिने; पिण्याच्या पाण्यातून दिले गुंगीचे औषध, नाशिक जिल्हा रुग्णालयाबाहेरील घटना
गाडेकर मळा ते सिन्नर फाटा दरम्यान तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांच्या १० कोटी रुपयांच्या निधीतून साडेसात मीटर रुंदीचे जवळपास दीड किमी लांबीचे दोन सर्व्हिस रोड तयार करण्यात आले होते. नैसर्गिक नाल्यांवर पुलाची कामेही पूर्ण झालेली होती. विशेष म्हणजे या रस्त्यांच्या दुतर्फा लेआउट झालेले नव्हते. कोणीही वास्तव्यासदेखील नव्हते. असे असतानाही येथे दोन सर्व्हिस रोडवर १० कोटी रुपयांचा निधीही खर्च झाला होता. या रस्त्यामुळे या ठिकाणच्या जमिनींचे मूल्यही काही पटींनी वाढले होते.
आता या ठिकाणी पालिकेने बाह्य रिंगरोड प्रस्तावित केल्याने हे दोन्हीही सर्व्हिसरोड खणून काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी, जनतेच्या १० कोटी रुपयांचा निधीही वाया गेला आहे. या ठिकाणी आता बाह्य रिंगरोड होणार असून, हा रिंगरोड देखील पूर्वेस सरकविण्यात आला आहे.
त्र्यंबकराजाच्या ‘विराम दर्शना’साठी मोजा अडीच हजार! दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी विश्वस्त मंडळाचा अजब प्रस्ताव; नव्या वादाची चिन्हे
पालिकेचा दावा वेगळाच
या ठिकाणी डीपी रोड प्रस्तावित होता. त्याच्या दोन्ही बाजूंनी पालिकेनेच सर्व्हिस रोड तयार केले होते. अतिक्रमण होऊ नये या उद्देशाने अगोदर दोन्ही सर्व्हिस रोडची कामे पालिकेने स्वखर्चातून केली. खडीकरणही पालिकेने केले. मात्र, येथे रिंगरोड प्रस्तावित झाल्याने डांबरीकरण थांबविल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने ‘मटा’ला दिली. या दाव्यामुळे या रस्त्याच्या कामातील गौडबंगाल आणखी वाढले आहे.
Nashik Crime : मॉडर्न मुलगी अचानक पंजाबी ड्रेसमध्ये, विशिष्ट महिन्यात उपवास, कुटुंबाला संशय, ‘द नाशिक स्टोरी’चा कॉलेजपासूनचा प्रवास उघड
माझ्या खासदार निधीतून १० कोटी रुपये खर्चुन दोन सर्व्हिसरोड तयार करण्यात आले होते. हे रस्ते कायम ठेवून रिंगरोड करणे अपेक्षित होते. हे रस्ते काढण्याची गरज नव्हती. – हेमंत गोडसे, माजी खासदार
दोन्ही रस्ते खणून टाकल्याने दहा कोटी रुपये वाया गेले. पालिकेकडून करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी का केली जात आहे? ‘आंधळे दळते अन् कुत्रे पीठ खाते’ असा हा प्रकार आहे. – बाजीराव भागवत, माजी नगरसेवक
