• Thu. Aug 6th, 2026

    पुणे-सातारा प्रवास फक्त 1 तासात; महामार्गावर बहुमजली उड्डाणपुलांची योजना, शिरवळ, खंबाटकी घाटातील कोंडी फुटणार

    पुणे-सातारा प्रवास फक्त 1 तासात; महामार्गावर बहुमजली उड्डाणपुलांची योजना, शिरवळ, खंबाटकी घाटातील कोंडी फुटणार

    Pune News: राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार करून पुणे ते सातारा मार्गावर 6,000 कोटी रुपये खर्च करून 5 ते 6 उड्डाणपूल बांधण्याची योजना आहे. त्यासह 140 किमी लांब पश्चिम बायपास सुद्धा प्रस्तावित आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी पुणे ते सातारा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक कोंडी पाहून या भागांत पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. NHAIच्या या उपाययोजनांमुळे पुणे ते सातारा कॉरिडोरवरील वाहतूक सुलभ होण्याची शक्यता आहे.

    प्रवास केवळ एका तासांत

    केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अलीकडेच खंबाटकी घाट आणि नवले पूल परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुणे ते सातारादरम्यान पाच ते सहा उड्डाणपूल उभारण्याची योजना मांडली. सध्या पुणे ते सातारा प्रवासा 1.30 ते 2 तास वेळ जातो. वाहतूक कोंडी असली तर सव्वा दोन तास तर हमखास जातात. त्यात साताऱ्यातून पुढे गावात जाणाऱ्या वाहनांना तर आणखी वेळ लागतो. हाच प्रवासाचा वेळ अवघ्या 1 तासावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

    Maharashtra TimesShaktipeeth Expressway: मुंबई ते गोवा प्रवास 8 तासांत; पुणे-सोलापूर, बंगळुरूसह अनेक महामार्गांना जोडणार, 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग

    महामार्गावरील विस्तार आणि बायपस प्रक्लपांची योजना मांडण्यात आली आहे. NHAI सध्या 6,000 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत आहे. खंबाटकी शिरवळ आणि राष्ट्रीय महामार्गावरील इतर कोंडीच्या बॉटलनेक असलेल्या भागांमध्ये हे पूल बांधण्यात येतील. पुण्यातून खेडे गावात जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडी यामुळे सुधारणार आहे. तसेच, मालवाहतूकीच्या वाहनांनाही मोठा फायदा मिळणार आहे.

    140 किमी लांब बायपास मार्ग

    या योजनेअंतर्गत पुणे-सातारा कॉरिडोरवर बहुमजली उड्डाणपूल बांधण्यात येतील. या शिवाय पुणे-सातारा पश्चिम बायपास मार्गाच्या विकासाचाही यात समावेश आहे. या बायपास प्रक्लपासाठी सुमारे 6,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वळवण्याची योजना आहे. त्यामुळे महामार्गावरील कोंडी कमी होऊन प्रवासी वाहनांना फायदा होईल. या मार्ग 140 किलोमीटर लांब असेल. या नव्या प्रकल्पांमुळे पुणे-सातारा महामार्गावर ब्लॅक स्पॉट्स हटवले जातील आणि वाहतुकीच्या नव्या सुविधा उपलब्ध होतील अशी महिती NHAIमधील एका वरिष्ठ अभियंत्याने Hindustan Timesशी बोलताना दिली. या प्रकल्पाचा आराखडा सध्या तयार करण्यात येत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

    Maharashtra Times‘सुपर हायवे’ पुन्हा लांबणीवर; निधीअभावी Mumbai-Pune Expresswayचं दहापदरीकरण रखडणार, 16 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

    अवजड वाहनं आणि मोठे ट्रक हलक्या वाहनांसोबतच या मार्गावरून जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यासह वीकेंड किंवा सणवाराला वाहतूक कोंडी होते. अनेकदा प्रवाशांचे दीड ते दोन तास खंबाटकी घाटात किंवा शिरवळमध्ये जातात. या नव्या उड्डाणपुलांपुळे या समस्या सुटतील अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा