Pune Childs Missing Case: जवळचे पैसे संपल्यानंतर ही मुले स्वारगेट बस स्थानकात थांबली होती. पोलिस व नातेवाइकांनी या मुलांना ताब्यात घेतले.
पाच मुले बेपत्ता झाल्याने आई-वडील आणि नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान स्वतः जवळील पैसे संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलांनीच पालकांना फोन केला होता. मांजरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबांतील बेपत्ता झालेल्या मुलांचे आई-वडील सिंहगड रस्ता परिसरात राहतात. ही मुले मांजरी येथील त्यांच्या नातेवाइकाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. यामध्ये १५ वर्षांची एक, १४ वर्षांची एक आणि नऊ वर्षांची एक अशा तीन मुली, तर चौदा वर्षांचा व नऊ वर्षांचा असे दोन मुलगे यांचा समावेश आहे.
NEET पेपरफुटीचा ‘गॉड’फादर कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून संशयास्पद बाबी उघड
या पाचही जणांनी २० मे रोजी सायंकाळी चार वाजता मांजरी येथून घर सोडले आणि ते रिक्षाने बाहेर निघाले. मुले घरात दिसत नसल्याने नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, मुले सापडली नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी मांजरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन, मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
दरम्यान, ही मुले स्वारगेट बस स्थानकात गेली. ती रात्र त्यांनी स्थानकातच काढली. जवळचे पैसे संपल्यानंतर त्यांनी काय करायचे हा विचार करून, त्यातील एकाने आईला फोन करून स्वारगेटला असल्याचे सांगितले. दुसरीकडे मांजरी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून सीसीटीव्हीच्या माध्यमातून युद्धपातळीवर मुलांचा शोध घेतला आणि स्वारगेट बस स्थानकापर्यंत पोहोचले. तेथे मुलांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन, बालकल्याण समितीकडे नेण्यात आले.
Vidhan Parishad : आमचे 333 चे बळ, लावा ताकद! स्थानिक आघाड्यांची रसद, पुण्याच्या जागेवर भाजपचा फायनल दावा! राष्ट्रवादीवर दबाव वाढला
समितीला सांगितली हकीकत
समितीने मुलांकडे विचारणा केली. ‘आई-वडिलांकडून कोणताही त्रास होत नाही, आम्ही वसतिगृहात राहून, स्वतः शिक्षण घेऊन मोठे होण्याचा विचार केला होता. म्हणून आम्ही बाहेर पडलो,’ असे मुलांनी सांगितले. त्यानंतर मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या दरम्यान मुलांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले
