• Sat. Jun 6th, 2026

    Shirdi Artillery Bomb Project : साईंच्या शिर्डीत श्रद्धेसोबत शक्तीचा नवा अध्याय; अख्ख्या देशातील सर्वात मोठा तोफगोळा प्रकल्प; बड्या नेत्याच्या हस्ते उद्घाटन

    Shirdi Artillery Bomb Project : साईंच्या शिर्डीत श्रद्धेसोबत शक्तीचा नवा अध्याय; अख्ख्या देशातील सर्वात मोठा तोफगोळा प्रकल्प; बड्या नेत्याच्या हस्ते उद्घाटन

    Shirdi Artillery Bomb Production Project : शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या तोफगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे.

    सावळीविहीर तोफगोळा प्रकल्प नोकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, अहिल्यानगर : देशाच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि ऐतिहासिक नोंद होण्याची तयारी सुरू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असून दररोज देश विदेशातून भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. शिर्डीत श्रद्धेसोबत आता शक्तीचाही नवा अध्याय सुरू होत आहे.

    राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

    जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळत असून, शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज 23 मे रोजी सायंकाळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून सुरू होत असलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
    Maharashtra TimesVidhan Parishad : आमचे 333 चे बळ, लावा ताकद! स्थानिक आघाड्यांची रसद, पुण्याच्या जागेवर भाजपचा फायनल दावा! राष्ट्रवादीवर दबाव वाढला​

    155 मि.मी. क्षमतेचे 5 लाख तोफगोळे

    खासगी क्षेत्रातील हा देशातील सर्वात मोठा तोफगोळा निर्मिती कारखाना आहे. येथे प्रतिवर्षी 155 मि.मी. क्षमतेचे 5 लाख तोफगोळे तयार होणार आहेत. संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी असून, हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. शिर्डीतील प्रकल्पासाठी 1 हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून 600 कोटी पूर्ण असून, यामुळे सुमारे 2 हजार जणांना रोजगार मिळेल. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर ही रोजगार संख्या 4 ते 5 हजारांवर जाईल. 200 एकर क्षेत्रावर रॉकेट लाँचर, ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. तसेच, याच दिवशी 15 टन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचंही उद्घाटन होईल.

    ‘संरक्षण उत्पादन केंद्र’ म्हणून नवी ओळख

    नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील 600 एकर जागेवर 2 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून स्फोटक निर्मिती संकुल उभारलं जात आहे. येथे दरवर्षी 20 टन टीएनटी उत्पादनाची देशातील सर्वात मोठी क्षमता निर्माण होईल. शिर्डीत बनणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटकं भरण्याचं काम येथे केले जाईल. स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी ‘रतन टाटा ट्रस्ट’ 200 कोटी निधी आणि एमआयडीसी 50 कोटी निधीच्या सहकार्याने विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू होत आहे.
    Maharashtra TimesCJP Instagram Hack : कॉक्ररोच जनता पार्टीचं इनस्टाग्राम अकाउंट हॅक, फॉलोअर्सची संख्या घटली?; अभिजीत दीपके काय म्हणाले…
    या उद्घाटनानिमित्त 23 व 24 मे रोजी भव्य संरक्षण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात 100 हून अधिक MSME कंपन्या सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ देणारा हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्याला देशातील एक प्रमुख ‘संरक्षण उत्पादन केंद्र’ म्हणून नवी ओळख मिळवून देणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा