• Sat. Jun 13th, 2026
    Solapur Crime : लेकराचं डायपर घ्यायला गेला, पुन्हा परतलाच नाही, बापाचा संशयास्पद मृत्यू; मोबाईलच्या एका रिंगमुळे कुटुंबाला समजलं

    Solapur Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशात सोलापुरात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    सोलापूर २४ वर्षीय तरुणाची बॉडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील नई जिंदगी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. ‘मुलाचे डायपर पॅड आणतो’, असं सांगून बाहेर पडलेल्या एका 24 वर्षीय तरुणाची बॉडी आढळली आहे. फॅब्रिकेशन काम करणाऱ्या तरुणाचा पनाश अपार्टमेंट परिसरामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत बॉडी आढळून आली आहे. सुफियान गुलाम रसूल शेख (वय 24 वर्षे, नई जिंदगी सोलापूर) असं मृत तरुणाचं नाव आहे. काल शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुफीयान या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    सुफीयान परतलाच नाही

    सुफियान शेख हा फॅब्रिकेशनचं काम करत होता. सुफीयान शेख याचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे. काल शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुफियान आपल्या घरातून मुलाचं डायपर आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, घरून निघाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांतच तो पनाश परिसरात पोहोचला आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
    Maharashtra TimesRatnagiri Crime: चारपानी पत्र लिहून ३३ वर्षीय बँक कर्मचारी बेपत्ता, चिठ्ठीत चौघांची नावं; धरणाजवळ दुचाकी सापडल्याने धाकधूक

    वॉचमनमुळे घटना उघडकीस

    काल शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पनाश अपार्टमेंट परिसरातील वॉचमन नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना, त्याला तिथे एक तरुण निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यात हात आणि पाय वाकडे होऊन तुटून पडलेले होते. तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. घटनेची माहिती वाऱ्यासारखी सोलापूर शहरात पसरली. पनाश अपार्टमेंट परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड आणि अमलदार विलास घुगे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
    Maharashtra TimesNashik Crime : मॉडर्न मुलगी अचानक पंजाबी ड्रेसमध्ये, विशिष्ट महिन्यात उपवास, कुटुंबाला संशय, ‘द नाशिक स्टोरी’चा कॉलेजपासूनचा प्रवास उघड

    फोनची रिंग वाजली अन्…

    बराच वेळ सुफियान घरी न आल्यानं कुटुंबीयांनी सुफीयानला फोन करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाजणारा फोन उचलला. त्यावेळी कुटुंबीयांनी ‘कितना देर हुआ कहाँ है तू?’ असा प्रश्न विचारला. पोलिसांनी घडलेली घटना सांगितल्यानंतर नातेवाईक हे शासकीय रुग्णालयात येऊन गर्दी केली होती.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा