• Sat. Jun 6th, 2026

    Abhijeet Dipke : ‘आमचं नाही ऐकलं तर अमेरिकेतही संपवू!’ CJP अध्यक्ष अभिजित दीपकेंना आधी ऑफर दिली; नंतर उघड धमकी, काय घडलं?

    Abhijeet Dipke : ‘आमचं नाही ऐकलं तर अमेरिकेतही संपवू!’ CJP अध्यक्ष अभिजित दीपकेंना आधी ऑफर दिली; नंतर उघड धमकी, काय घडलं?

    Abhijeet Dipke death threat: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी आता सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा केला आहे. अनेक खळबळजनक कथित मेसेज असेलेले स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: सध्या सोशल मीडियावर एकाच पक्षाची हवा आहे. तो म्हणजे सीजेपी. होय, सोशल मीडियावरील आपल्या धारदार आणि उपरोधिक राजकीय पोस्टमुळे हा जेन-झीचा ऑनलाइन पक्ष प्रचंड चर्चेत आला आहे. या पक्षाच्या पेजचे म्हणजे ‘ कॉकरोच जनता पार्टी ’चे संस्थापक अभिजित दीपके यांना आता जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीपके यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत या प्रकाराचा खुलासा केला आहे. धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉटही त्यांनी सार्वजनिक केला असून, या घटनेमुळे ऑनलाइन जगतात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    अमेरिकेतही मारून टाकण्याची धमकी

    अभिजित दीपके यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार , त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून कथित धमकीचे मेसेज आले आहेत. या चॅट स्क्रीनशॉटमध्ये, “तुला पैसे मिळतील, तुझे हे अकाउंट बंद कर, नाहीतर भाजपमध्ये ये. जर ऐकले नाहीस, तर अमेरिकेतही तुला मारून टाकले जाईल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. “मला नुकतीच जीवे मारण्याची धमकी आली आहे,” अशा कॅप्शनसह दीपके यांनी हा खळबळजनक चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टनंतर त्यांच्या सुरक्षेबाबत नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

    नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

    धमकीची ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेक युजर्सनी “आम्ही तुझ्यासोबत आहोत, घाबरू नकोस,” असा धीर दिला आहे. तर काहींनी या संपूर्ण प्रकरणामागे नक्की कोणाचा हात असू शकतो, याबाबत संशय व्यक्त केला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींचा शोध घ्यावा आणि दीपके यांना त्वरित सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही अनेक नेटकऱ्यांनी केली आहे.

    Maharashtra TimesMumbai Rain: उन्हाने तापलेल्या रस्त्यांवर ओल्या सरी; मुंबईत अखेर पावसाची हजेरी, ‘आयएमडी’चा ताजा अंदाज जाहीर

    भारतात परतताच अटकेची भीती

    अभिजित दीपके सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भारतात परतण्याबाबत आपली भीती व्यक्त केली होती. “पुढील महिन्यात माझा भारतात परतण्याचा विचार आहे. परंतु, मी दिल्ली विमानतळावर उतरताच पोलीस मला ताब्यात घेतील किंवा अटक करतील अशी भीती वाटते,” असे त्यांनी म्हटले होते.

    काय आहे कॉकरोच जनता पार्टी?

    ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे एक ऑनलाइन पेज आहे, ज्याला काहीच दिवसांमध्ये २०.३ मिलियन लोकांनी फॉलो केले आहे. हा पक्ष सध्यातरी अधिकृत किंवा प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी रेजिस्टर झालेला नाही, किंवा राजकीय संघटना म्हणूनही कुठेही नोंदवला गेलेला नाही. देशाचे सरन्यायाधीस सूर्यकांत यांनी एका प्रकरणात देशातील काही युवकांना उद्देशून झुरळ हा शब्द प्रयोग केला होता. त्यांच्या विरोधातील असंतोष म्हणून या पेजची सुरुवात करण्यात आली होती. या पेजच्या निर्मितीमागील कारण पाहता हे पेज जेन-झीमध्ये अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा