Mumbai Crime : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बेडरुममध्ये पोलिसांना बिअरच्या रिकाम्या बाटल्या, एक फुटलेली बाटली, मृत राजेशचा टी-शर्ट आणि घटनेपूर्वी त्या फ्लॅटमध्ये अनेक जणांची उपस्थित होती, हे दर्शवणारे पुरावे आढळले
सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद
गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएलच्या एका ओस पडलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन राजेश परमार याने उडी मारल्याचे सांगण्यात येते. विनोबा भावे नगर पोलिसांनी सुरुवातीला या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र राजेशच्या कुटुंबीयांकडे केलेल्या चौकशीदरम्यान हे प्रकरण लैंगिकतेवरुन झालेल्या ब्लॅकमेल आणि जीव देण्यास प्रवृत्त करण्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले, असे पोलिसांनी सांगितले.
इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पोलिसांना बिअरच्या रिकाम्या बाटल्या, एक फुटलेली बाटली, मृत राजेशचा टी-शर्ट आणि घटनेपूर्वी त्या फ्लॅटमध्ये अनेक जणांची उपस्थित होती, हे दर्शवणारे पुरावे आढळले; अशी माहिती गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
व्यवस्थेविरुद्ध आक्रोश, अभिजीत दिपकेचं अकाऊंट बंद, अंजली दमानिया कॉकरोच पार्टीसोबत!
चौघांचा माग काढला
पोलिसांनी नंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि चार तरुणांचा शोध लावला — प्रीतम फुलचंद यादव, फैजान अली अन्सार अहमद शाह, प्रकाश रामकुमार गुप्ता आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा — जे राजेशच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्याच्यासोबत उपस्थित होते, असा आरोप आहे.
Gaondevi Fire : 42 व्या वर्षी घरी पाळणा हलला, पण लेकीच्या जन्मानंतर दोनच महिन्यात आक्रित, गावदेवी मार्केट आगीत पित्याचा करुण अंत
डेटिंग अॅपवर भेट, पैसे उकळण्याचा कट
चौकशीदरम्यान पोलिसांना समजले की, आरोपींनी एका ‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून आमिष दाखवून राजेशला त्या ओसाड इमारतीकडे बोलावले होते. राजेशच्या लैंगिक प्रवृत्तीबद्दल समजल्यानंतर, त्याच्याकडून पैसे उकळण्याचा कट त्या अल्पवयीन आरोपीने रचला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबांनुसार, राजेश परमार याला एका ओसाड इमारतीमधील फ्लॅटमध्ये नेण्यात आले; तिथे चारही आरोपींनी त्याला धमकावले, शिवीगाळ केली आणि ‘तुला पुरुष आवडतात, हे उघड करु’ असे सांगून आपल्या कुटुंबीयांना फोन करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला.
अल्पवयीन आरोपीकडून चुकीची कबुली
चौकशीदरम्यान, त्या अल्पवयीन आरोपीने आपल्या चौघांकडून घडलेली ही “चूक” कबूल केली आणि सांगितले की त्यांनी राजेशकडे पैशांची मागणी केली होती, तसेच बिअरची बाटली फोडून व त्याला धमकावून आणखी भयभीत करण्याचा प्रयत्न केला होता.
“राजेशने आरोपींकडे आपल्या कुटुंबीयांना याबद्दल न कळवण्याची आर्त विनंती केली आणि त्यांना पैसेही देऊ केले; मात्र धमक्या देणे सुरुच राहिले. त्यानंतर काही क्षणांतच, राजेशने फ्लॅटमधील बेडरुमच्या उघड्या खिडकीतून खाली उडी मारल्याचे म्हटले जात आहे” असे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
Twisha Sharma Death : मी ज्या-ज्या लोकांशी फोनवर बोलले ते फक्त सांत्वनाच्या हेतूने होते! ट्विशाच्या मृत्यूनंतर फोनाफोनीवर सासूचे स्पष्टीकरण
इतरांनी थांबवूनही ऐकलं नाही
तपासादरम्यान असेही उघड झाले की, इतर तीन तरुणांनी त्या अल्पवयीन आरोपीला, राजेशला धमकावणे थांबवून त्याला जाऊ देण्यास सांगितले होते. मात्र त्याच्याकडून आणखी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात त्या अल्पवयीन आरोपीने त्याला धमकावणे सुरुच ठेवले, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
