Weather Update: मान्सूनपूर्व पावसाची अखेर मुंबईत सुरूवात झाली असून, मुलुंड, भांडुप आणि कांजुर मार्ग परिसरात शुक्रवारी सकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: वाढत्या उष्म्याने मुंबईकर अक्षरश: त्रस्त झाले होते. घरातून बाहेर पडताच अंगाची लाही-लाही होत. अशा वातावरणात मुंबईकर आतुरतेने मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत होते. शुक्रवारी सकाळी मान्सूनपूर्व पावासाला सुरूवात झाल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. हलक्या सरी का होईना, पण या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मुलुंड, भांडुपमध्ये हजेरी
कोकण किनारपट्टीवर 19 मे रोजीच मान्सूनपूर्व पावसाची वारे दाखल झाले होते. त्यानंतर मुंबईतही कधीही पावसाला सुरूवात होईल असा अंदाज होता. गुरूवारपासून महामुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाला होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पावासाने अखेर हजेरी लावली. उपनगरातील मुलुंडमध्ये हलका पाऊस झाला होता. त्यासह पूर्व उपनगरातील भांडुप आणि परिसरांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. सकाळी 11.20च्या सुमारस पाऊस पडला असून नागरिकांनी लगेच, पावासाचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करायला सुरूवात केली. मान्सूनच्या पहिल्या सरींमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
उन्हाने तापलेले रस्ते, गाड्या मान्सूनच्या पहिल्या सरींमुळे ओलसर झाले. उष्णतेच्या लाटांमुळे टोपी घालून घरातून निघणाऱ्या नागरिकांना छत्री काढावी लागणर आहे. मान्सूनपूर्व हंगामातील ही पावासाची पहिलीच सर. त्यामुळे संपूर्ण शहरात थोडा गारवा पसरला असून येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस
हवामान विभागाने केरळमध्ये 26 मेपासून मान्सूनला सुरूवात होईल असा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन यापूर्वीच झाले असल्यामुळे यंदा जूनपूर्वीच पावसाला सुरूवात होईल अशी आशा होती. त्यात यंदाच्या असह्य उष्म्यामुळे तर नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. हळूहळू संपूर्ण राज्यात मान्सूनची स्थिती निर्माण होत असल्याचा आयएमडीचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात 2 ते 5 जूनदरम्यान दाखल होईल असा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर कोकणातही मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळीही मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबई महानगर प्रदेशात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आता छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढण्याची वेळ येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा