श्रीराम मधु सरुनवर (वय २०, रा. तोणवाला, आमला, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Job Fraud: पुणे महापालिकेत बनावट भरती; युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा विजय कुंभार यांचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी नातेवाइक असून, दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, २०२५ मध्ये दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले होते. त्यानंतरही श्रीराम तिचा सतत पाठलाग करीत होता. त्रास असह्य झाल्याने तरुणीने मध्य प्रदेशात त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे आरोपी तिच्यावर चिडून होता. दरम्यान, भोपाळमध्ये काम करीत असताना तरुणीची ओळख आदर्श पांडे याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब समजल्यानंतर आरोपी दोघांनाही धमक्या देत होता. काही महिन्यांपूर्वी तरुणी आणि आदर्श पुण्यात येऊन ताडीवाला रस्ता परिसरात लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघेही ‘द मिलर रेस्टॉरंट बार’ मध्ये काम करीत होते. आरोपी वारंवार फोन करून ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाही,’ अशी धमकी देत असल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेच्या रात्री काम आटोपून तरुणी आणि आदर्श हे दोघे घरी जात असताना जनता विद्यालयाजवळ आरोपीने त्यांना अडवले. त्यानंतर त्याने थेट तरुणीच्या अंगावर अॅसिड फेकले. आदर्शने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही अॅसिड फेकण्यात आले. या हल्ल्यात तरुणीच्या पाठीवर, हातांवर आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या असून, ती जागीच कोसळली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
Accident News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; स्कोडा कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
चकवा देण्यासाठी आरोपीने बदलले कपडे
स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने दोघांनाही तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी रेल्वे स्थानकावरून चालुक्य एक्स्प्रेसने पसार झाल्याचे उघड झाले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने प्रवासादरम्यान तीन वेळा कपडे बदलल्याची माहितीही तपासात समोर आली. खंडणीविरोधी पथकातील पोलिस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले आणि तानाजी देशमुख यांच्या पथकाने आरोपीला हुबळी येथून ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक राम राजमाने आणि सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
