• Sat. Jun 6th, 2026
    Beed Accident : नुकताच सैन्यात भरती, भीषण अपघातात संदिपानचा जागीच करुण अंत, देशाच्या सेवेचं स्वप्न अधुरं; गावात शोककळा

    Beed Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, बीडमध्ये बुधवारी रोजी एक भीषण अपघात झाला. या अपघातात नुकताच सैन्यात भरती झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

    अहमदपूर अहिल्यानगर अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड : अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी 20 मे रोजी दुपारी भीषण अपघात झाला असून वाघिरा फाट्यानजीक झालेल्या या कार आणि मोटारसायकलच्या भीषण धडकेत भारतीय सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या एका 20 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. संदिपान भगवान बांगर असं या अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. या तरुणाच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.

    समोरासमोर दोन वाहनांची धडक

    बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावचे रहिवासी असलेला संदिपान भगवान बांगर (वय 20) हे बुधवारी 20 मे रोजी दुपारी आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच 23 एएच 8481 वरून वाघिरा फाट्यावरून गावाच्या दिशेनं जात होता. तो महामार्गावरून आपल्या गावाकडे वळत असतानाच, समोरून येणाऱ्या सातारा येथील एका भरधाव चारचाकी वाहन क्रमांक एमएच 11 बीके 0079ने दुचाकीला अत्यंत जोरदार धडक दिली. सदर अपघात एवढा भीषण होता की, संदिपान हा दुचाकीवरून दूरवर फेकला गेला. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी आणि वाहनधारकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत संदिपान याचा जागीच मृत्यू झाला.
    Maharashtra TimesShaktipeeth Expressway: मुंबई ते गोवा प्रवास 8 तासांत; पुणे-सोलापूर, बंगळुरूसह अनेक महामार्गांना जोडणार, 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग

    वाघिरा गावावर शोककळा

    संदिपान हा नुकताच भारतीय सैन्यदलात भरती झाला होता. संदिपानचा असा अकाली अंत झाल्यानं बांगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण वाघिरा गावात शोककळा पसरली.
    Maharashtra TimesPune Metro: ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?

    घटनास्थळी पोलीस दाखल

    या भीषण अपघाताची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार गणेश परझने आणि तलाठी गणपत पोतदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. संदिपान बांगर यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. सदर बॉडी नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा