Pune Metro: महा मेट्रोने स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गावरील कात्रज स्थानकाच्या बांधकामासाठी पीएमपी बसचे थांबे बदलले आहेत. या तात्पुरत्या बदलांमुळे प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: शहरात मेट्रोच्या अनेक मार्गांवरील काम सध्या वेगाने सुरू आहे. भविष्यात या मेट्रोंमुळे नागरिकांना फायदा होणार असला तरी सध्या त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. कात्रज येथे मेट्रोच्या स्थानकाचं काम सुरू असल्यामुळे तेथील बस थांबे हलवले आहेत. त्यामुळे कात्रज मधून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांना काही काळ या नव्या थांब्यांवरून बस पकडावी लागेल. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
कधीपर्यंत बदल लागू?
बुधवारी, 20 मेपासून, पीएमपीच्या कात्रज पोलिस चौक बस थांब्यावर कात्रज मेट्रो स्थानकाचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे येथील बस थांबा बदलला आहे. पुण्यातील पर्पल लाइन म्हणजे, स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावरील हे स्थानक असून अनेक वेगवेगळ्या स्थानकांसाठी थांबे आतापर्यंत हलवण्यात आले आहेत. पीएमपीने या बद्दल अधिकृत माहिती जाहीर केली आहे. मेट्रोच्या बांधकामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कात्रज पोलिस चौकावर थांबणाऱ्या बसचे थांबे तात्पुरते जवळच्या ठिकाणी हलवले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत ही सुधारित व्यवस्था कायम राहील अशी त्यांनी यावेळी माहिती दिली.
Pune Metro: ‘स्वारगेट ते कात्रज’ भुयारी मेट्रोने प्रवास होणार! बोगद्याच्या ‘सेगमेंटचे कास्टिंग’ सुरू; कशी-कुठे असतील स्थानकं?
कोणत्या बसवर परिणाम?
बदललेल्या व्यवस्थेप्रमाणे, मार्ग क्रमांक 2, 2अ, 11के, 24, 24अ, 90, 235, 236, 301, 301अ, के11, के12, के13, के14, के18 आणि रातराणी मार्ग 1 आणि 2 या बसेसना कात्रज बायपास मार्गावरील पुलाच्या खाली थांबा देण्यात आला आहे. शिवाय 42, 42, 298, 299, आणि 339 मार्गावर धावणाऱ्या बस नेहमीप्रमाणे गुजरवाडी बस स्टँडवरून रवाना होतील. पण कात्रज चौकातील पुलाखाली थांबतील. दरम्यान, 43, 43अ, 44, 45, 214 आणि 228 मार्गावरील बस कात्रज बायपास रोडमार्गे धावतील.
या काळात प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पीएमपीएलने केले आहे. यामुळे दक्षिण पुणे आणि उपनगरातील प्रवाशांसाठी हे महत्त्वाचे बस थांबे आहेत. यामुळे कात्रज जंक्शनवरील हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे. सकाळी प्रवास करणार्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही दिवसांसाठी थांब्यांवर कर्मचारी तैनात केले आहेत. त्याशिवाय फलकही लावले आहेत. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज प्रवास करणाऱ्यांनी या बदलांची दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai News: मान्सूनसाठी ‘एमएमआरडीए’ सज्ज! मेट्रो मार्ग आणि रस्त्यांवर विविध पायाभूत सुविधा; कसा होणार फायदा?
स्वारगेट ते कात्रज मेट्रोमुळे वाहतूक बदल
याशिवाय मेट्रोच्या बांधकामासाठी काही वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मार्केट यार्ड आि बिबलेवाडी परिसरात बांधकामाला सुरुवात झाली असून त्या परिसरातील वाहतूक वळवली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा