Nashik Leopard Attack: गुरुवारी (दि.२१) सकाळी बोरखिंड येथे घडलेल्या या दुहेरी हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या झटापटीत फोडसे यांच्या उजव्या हातालाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावरही बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जीव वाचवण्यासाठी निरगुडे यांनी उजव्या हाताने प्रतिकार केला आणि बिबट्याला परतवून लावले. मात्र, थरार इथेच थांबला नाही. पहिल्या हल्ल्यानंतर जांभळाच्या ५० ते ६० फूट उंच झाडावर जाऊन बसलेल्या बिबट्याने तासाभराने पुन्हा खाली उतरून दुसऱ्या तरुणावर झडप घातली.
पांडुरंग लक्ष्मण निरगुडे (४०) हे सकाळी सातच्या सुमारास घराजवळील शेतात बसून जनावरांसाठी चारा कापत होते. त्याचवेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. क्षणाचाही विलंब न करता निरगुडे यांनी उजव्या हाताने बिबट्याला प्रतिकार केला. झटापटीत त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली; मात्र त्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
Nashik Crime: विवाहित महिलेचा तब्बल सातवेळा गर्भपात; नाशिकमधील ३३ वर्षीय तरुणीचा छळ, पतीसह सासू-सासऱ्यांना दणका
घटनेनंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी रामदास हरळे यांनी जखमी निरगुडे यांना तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हल्ल्यानंतर बिबट्या जवळील जांभळाच्या झाडावर जाऊन बसला होता. परिसरात भीतीचे वातावरण असतानाच निरगुडे यांचे भाचेजावई सुभाष कचरू फोडसे (वय २६) हे त्यांच्या घरी आले. अंगणात पोहोचताच झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक खाली उतरून त्यांच्यावरही झडप घातली. पाठीमागून पंजा मारल्याने फोडसे यांचा शर्ट फाटला. हल्ल्याने काही क्षण तेही गांगरले; मात्र त्यांनी धाडस दाखवत उजव्या हाताने बिबट्याला प्रतिकार केला. त्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने पसार झाला.
Nashik Robbery Case : नाशिकमध्ये ज्वेलर्समध्ये दरोडा टाकणाऱ्यांना पंजाबमधून बेड्या, अंबाला जेलमध्ये शिजला प्लान
ग्रामस्थांमध्ये दहशत; तीन पिंजरे लावले
सोनार खोरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सलग दोन हल्ल्यांनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. सरपंच गणेश कर्मे यांच्या पुढाकाराने वन विभागाने घटनास्थळी तीन पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
