Nagpur News: हंसापुरीतील नाल साहब परिसरातील हमीद खान यांना गँगरिनच्या उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हमीद खान यांना गँगरिनच्या उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया करून तो कापणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शस्त्रक्रिया पार पडली. वरिष्ठांची परवानगी घेऊन तीन ते चार दिवसांत पाय सुपूर्द केला जाईल, असे आश्वासन डॉक्टरांनी दिले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. १८ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजतादरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्याच रात्री हमीद खान यांचे उपचारादरम्यान निधन झाले. १९ मे रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार विधीदरम्यान कापलेला पाय परत मिळाला नसल्याची माहिती कुटुंबीयांनी दिल्यानंतर हा वाद समोर आला.
Nagpur Police: गाडीत डिझेलच नाही; तुमची हरवलेली मुलगी कशी शोधू? पालकांना बेजबाबदार उत्तर देणाऱ्या ठाणेदाराला दणका
– म्हणून दिला नाही
मोमिनपुरा येथील नगरसेवक वसीम खान यांनी कुटुंबीयांसह मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांची भेट घेतली. चौकशीनंतर संबंधित अवयव शस्त्रक्रियेच्या दिवशीच भांडेवाडी येथे जैववैद्यकीय कचरा म्हणून विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. डॉ. रवी चव्हाण यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर संबंधित अवयव जैववैद्यकीय कचऱ्यात मोडतो आणि नियमांनुसार त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असते. हा अपघातातील स्वच्छ ‘कट’ नसून गँगरिनसारखा संसर्गजन्य प्रकार होता. त्यामुळे नियमांनुसार तो अवयव कुटुंबीयांकडे सुपूर्द करता येत नाही. कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, कुटुंबीय चार दिवसांनी आले. त्यानंतर तो अवयव परत मिळवणे शक्य नव्हते, असे डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘वेळेत माझ्याकडे आले असते तर कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन काही मार्ग काढता आला असता’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Nagpur Accident: रात्रभर विटा भरल्या, पहाटे केबिनमध्ये झोपले; भरधाव ट्रक उलटून 3 मजूर दगावले, नागपूर हळहळलं
माफी मागावी…
या प्रकाराला रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांचा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे नगरसेवक वसीम खान यांनी म्हटले असून, रुग्णालय प्रशासनाने लेखी माफी मागावी तसेच जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या धार्मिक भावना व श्रद्धांचा आदर राखणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
