NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर CBI कोठडीत असतानाही लातूरमधील RCC क्लासेस पुन्हा सुरू झाले आहेत. नव्या NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी 1500 विद्यार्थी उपस्थित असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आरसीसी क्लासेसने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले आहेत. आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला या प्रकरणात सीबीआयने अटक केली असून सध्या तो सीबीआयच्या कोठडीत आहे. दरम्यान, नीट परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आरसीसी व्यवस्थापनाने पुन्हा क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद
आजपासून सुरू झालेल्या या वर्गांना पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आरसीसीमध्ये नीटची तयारी करणाऱ्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी वर्गांना उपस्थिती लावली. पुढील दोन-तीन दिवसांत उर्वरित विद्यार्थीही उपस्थित राहतील, असा विश्वास व्यवस्थापनाने यावेळी व्यक्त केला आहे.
लातूरमध्ये कारवाई सुरुच
नीट २०२६ परीक्षा ३ मे रोजी पार पडली होती. मात्र पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणात आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली असून त्याची नऊ दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर लातूरमध्ये सीबीआयकडून तपास आणि झाडाझडतीची कारवाई सुरूच आहे.
Solapur News: होय आम्ही झुरळ! CJPचा महाराष्ट्रात मोठा इफेक्ट, कोर्टाविरोधात युवक रस्त्यावर, पोलिसांना चकवलं, 4 मागण्यांचं निवेदन दिलं
विद्यार्थ्यांना क्लासला बोलावलं
दरम्यान, नव्याने नीट परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी आरसीसी व्यवस्थापनाने पुन्हा वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले. याआधी परीक्षा झाल्यानंतर जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र परीक्षा पुन्हा होणार असल्याने विद्यार्थ्यांना संदेश पाठवून आजपासून नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
पालकांनीही नुकसानाच्या पार्श्वभूमीवर दिला पाठिंबा
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लाखो रुपयांचे शुल्क भरलेले असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. नव्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पुन्हा तयारी करून घेतली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता २१ जून २०२६ रोजी होणार आहे. याबाबत एनटीएकडून घोषणा करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा