गेल्या अडीच महिन्यांपासून मध्य पूर्वेत संघर्षाची स्थिती आहे. अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध थांबलेलं असलं तरी संघर्ष कायम आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात चिंताजनक स्थिती आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यानं जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध थांबायला नको आहे असं मत विनय जोशींनी व्यक्त केलं.या परिस्थितीमुळे भविष्यात जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढतील असा अंदाज विनय जोशींनी व्यक्त केला.चीन आणि तैवान यांची युद्ध झाल्यास सेमी कंडक्टर वरती मोठा परिणाम होईल अशी मोठी भीतीही बोलून दाखवली.