• Mon. Sep 7th, 2026
Raj Thackeray : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यात करण्यात आले होते. सदर प्रकरणी राज ठाकरेंसह सात इतर मनसैनिकांवर विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती, पण नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता. १३ मे रोजी या प्रकऱणी सुनावणी पार पडली होती. यावेळी राज ठाकरे स्वतः सुनावणीसाठी हजर झाले होते. या गुन्ह्याशी माझा कोणताही थेट संबंध नाही. ज्यावेळी हे आंदोलन झाले, त्यावेळी मी नाशिकमध्ये होतो. तसंच कोणालाही हिंसाचारासाठी प्रवृत्त केले नाही असं राज ठाकरेंनी त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले होते. अखेर आज ठाणे सत्र न्यायालयाने आज 21 मे रोजी निकाल दिलाय. या प्रकरणातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 18 वर्षांनी सदर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल जाहीर केला. सरकारी पक्षाने गुन्हा सिध्द होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यामुळे पुराव्यानभावी राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed