अनेक पंप बंद असल्याने वाहनात इंधन भरून घेण्यासाठी शहरात अथवा शहरालगत सुरू असणाऱ्या पंपांवर वाहनधारकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी पंपांवर पेट्रोल उपलब्ध होत ठिकाणी पंपांवर पेट्रोल उपलब्ध होत असले, तरी हव्या त्या प्रमाणात डिझेल मिळत नसल्याचे वास्तव निदर्शनास आले आहे. नाशिकमध्येही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोलपंपांसमोर ‘नो स्टॉक’ चे फलक झळकले असून, ज्या काही पेट्रोलपंपांवर इंधन शिल्लक आहे तेथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.
Nashik Crime: नाशिकमध्ये मोठा दरोडा, लाखो रुपये कॅश आणि तब्बल १५ तोळे सोने लंपास, CCTV मध्ये काय दिसलं?
कॅनमध्येही डिझेल भरून देण्याची मागणी वाहनधारक करीत असले, तरी त्यास मज्जाव असल्याने कामे थांबण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दुपारी इंधन कंपन्यांची बैठक बोलावली होती. इंधनाअभावी कामे खोळंबू नयेत याकरिता या कामांच्या ठिकाणीच इंधन पुरवठा करण्यासंदर्भात पेट्रोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. कुंभमेळ्याची कामे कोणत्या ठिकाणी सुरू आहेत याची यादी कंपन्यांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
नागरिकांनी करावी तक्रार
अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांना हवे तेवढे डिझेल मिळत नसल्याचा प्रत्यय येत आहे. विशिष्ट रकमेचेच इंधन मिळेल अशी सक्ती केली जात होती. परंतु, जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. जर पंपचालकांनी इंधन वितरणावर ‘कॅपिंग’ लावण्याचा प्रयत्न केला, तर थेट जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. संबंधितांवर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
Child Death Cases: बालमृत्यू प्रकरणांत हलगर्जी भोवणार! ZPकडून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
१९ टक्के अधिक इंधनसाठा
जिल्ह्यात इंधनटंचाई नाही. गतवर्षीच्या तुलनेत १९ टक्के अधिक इंधनसाठा उपलब्ध असल्याची माहिती कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली. इंधनसाठा संपुष्टात येणार या भीतीने नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोलपंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इंधन कंपन्यांकडे उपलब्ध इंधनसाठा (‘केएल’मध्ये)
इंधन कंपनी- पेट्रोल- डिझेल
भारत पेट्रोलियम- ६,९१८ –१३,१५६
हिंदुस्थान पेट्रोलियम- ५,३१३ –८,९८५
इंडियन ऑइल कंपनी- ४,०३४ –७,९४३
