मराठा समाजातील तरुणांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित. मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची जोरदार चर्चा.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मराठा समाजातील तरुणांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी १५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता त्यातील पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाला सुरुवात झाल्याने मराठा समाजातील बेरोजगार आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या तरुणांना मोठा आधार मिळणार असल्याचे मानले जात आहे.
जरांगेंच्या आंदोलनाची पार्श्वभूमी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर आल्याने त्याकडे राजकीयदृष्ट्याही महत्त्वाने पाहिले जात आहे. अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलेला असताना सरकारकडून निधी वितरणाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांवर सरकारकडून हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
१५० कोटींच्या निधीचे वितरण
नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा निधी महामंडळाला देण्यात आला आहे. या निधीतून विविध रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योग योजनांना चालना दिली जाणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य, कर्ज सुविधा आणि विविध योजनांचा लाभ दिला जातो.
‘महाराष्ट्रावर अल निनोचं मोठं संकट, पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर’, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची माहिती
निधी वितरण कसे ठरते?
महामंडळासाठी मंजूर निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जातो. २० टक्के, ३० टक्के, ४० टक्के आणि ५० टक्के अशा स्वरूपात निधी देण्याची प्रक्रिया राबवली जाते. संबंधित निधीचा वापर आणि खर्चाचा अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर पुढील टप्प्यातील निधी मंजूर केला जातो. याआधीही ३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. आता नव्याने १५० कोटी रुपयांची भर पडली आहे.
शासनाने दिलेले आदेश
निधी खर्च करताना शासनाच्या वित्तीय नियमावली आणि अटी-शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. निधीच्या वापरात कोणतीही अनियमितता होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत.
दरम्यान, महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक तरुणांना मिळावा यासाठी उत्पन्न मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला वार्षिक ६ लाख रुपयांपर्यंत असलेली मर्यादा वाढवून ८ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिक कुटुंबांतील तरुणांना या योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा