• Sat. Jun 6th, 2026
    Nashik Ring Road : शेतकऱ्यांचा अन्यायाविरुद्ध लढ्याचा निर्धार; रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची बैठक, बैठकीतील प्रमुख ठराव कोणते?

    Nashik Kumbh Mela Ring Road Farmers Protest : नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन रिंगरोड बनवणार आहे. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध लढ्याचा निर्धार केला आहे.

    नाशिक कुंभमेळा शेतकरी आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुंभमेळ्याच्या नावाखाली रिंगरोडसाठी विविध गावांमध्ये बळजबरीने व बेकायदेशीर पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत प्रशासनाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार रविवारी (दि. 17) विल्होळी येथे झालेल्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी केला.

    बैठकीत काय घडलं?

    रविवारी सकाळी विल्होळी येथील कै. केशवराव थोरात ग्रामसंस्कार केंद्रात बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला नाशिक पंचक्रोशीतील गौळाणे, आंबे बहुला, राजूर बहुला, आडवण, त्र्यंबक, पारदेवी, चिंचोली, पांढुर्ली, दरी-मातोरी, मुंगसरा, पालखेड, दिंडोरी, सिन्नर, अंबड, सातपूर अशा विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाविरोधात एकत्र लढा उभारण्याचा निर्धार करीत, विविध ठराव मंजूर करण्यात आले. बैठकीला शेतकरी नेते साहेबराव दातीर, छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, ॲड. कैलास खांडबळे, विक्रम नागरे, शिवसेना शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख हरिभाऊ बोडके, माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis: जरांगेंना टोला, मराठा समाजाच्या योजनांवर खुलासा; गंभीर आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

    गिरीश महाजनांवर रोष

    बैठकीत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचा आरोप करीत ‘गिरीश महाजन हटवा, नाशिक जिल्हा वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. भविष्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानावर अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशाराही साहेबराव दातीर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला. ‘कुंभमेळा मंत्री’ हे पद असंवैधानिक असल्याचा दावा करीत, महाजन यांनी चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप सुरूच ठेवला तर त्यांच्या ‘कुंभमेळा मंत्री’ या पदाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा देण्यात आला. महाजन व जिल्हाधिकारी प्रसाद यांना हटवून नवीन जबाबदार पालकमंत्री व जिल्हाधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली.

    जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारणार जाब

    आज, सोमवारी सकाळी 11 वाजता शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जमणार असून, भूसंपादन अधिकारी पवन दत्ता यांच्यावर काय कारवाई केली, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करणार आहेत. त्यानंतर महिरावणी येथील पीडित वृद्धेच्या घरी जाऊन आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. चुकीच्या मोजण्या तत्काळ रद्द कराव्यात, डीपी व आरपी रोडच्या नियमानुसारच नव्याने मोजणी करावी व ज्या शेतकऱ्यांची जमीन जाईल त्यांना चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्यावा, अशी प्रमुख मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
    Maharashtra TimesDigital Arrest : आई, तो आयपीएस अधिकारी खोटा आहे! महाराष्ट्रातील माऊली दीड महिना डिजिटल अरेस्ट, 93 लाखांचा गंडा, अमेरिकेत मुलांना समजताच मोठ्या घडामोडी

    बैठकीतील प्रमुख ठराव

    कुंभमेळ्याच्या नावाखाली होत असलेल्या भूसंपादनाविरोधात लोकशाही व कायदेशीर मार्गाने लढा उभारणे

    प्रत्येक बाधित गावातील पाच युवकांना शेतकरी संघटनात्मक प्रशिक्षण देणे

    शेतकऱ्यांच्या कायदेशीर लढ्यासाठी वकिलांची निवड करुन मार्गदर्शन घेणे

    भूमाफिया व बिल्डरांविरोधात तीव्र आंदोलन उभारणे

    शेतकऱ्यांच्या पाठीशी न उभे राहणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात प्रचार मोहीम राबवविणे

    शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडणे

    जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी व्यापक जनजागृती करणे

    बिल्डर व भूमाफियांविरोधात कायदेशीर आणि संघटित लढा उभारणे

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा