• Mon. Jun 15th, 2026
    Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाभोवती फास आवळला: तीन मुलांची साक्ष महत्त्वाची ठरणार; लहानग्यांनी नेमकं काय पाहिलं?

    Pune Bhor Crime: परिसरात खेळणाऱ्या १० ते ११ वर्षे वयोगटातील तीन मुलांनी पीडितेला आरोपी गोठ्याकडे घेऊन जाताना पाहिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

    आरोपी भीमराव कांबळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळेविरोधात १,१०० पानांचे आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री विशेष न्यायालयात सादर केले. पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या गुन्ह्याचा अवघ्या १५ दिवसांत तपास पूर्ण करून पन्नासहून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणीसह वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवाल आदी भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.

    पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी या गुन्ह्याचा कसून तपास करून आरोपीविरोधात १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्यानुसार त्यांनी स्वतः रात्री उशिरापर्यंत न्यायालयात थांबून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष सरकारी वकील अजय मिसार, तपास अधिकारी निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासह तपास पथकातील अधिकारी या वेळी उपस्थित होते.

    ‘या संवेदनशील गुन्ह्याचा अत्यंत काटेकोर तपास करून आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ‘नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमन’अंतर्गत विशेष न्यायालयात या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी चालविण्यात येईल,’ असे अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

    भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी (१ मे) साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी काही तासांत आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) (अपहरण), ६४ व ६५ (बलात्कार), १०३ (खून), ७४ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळजबरी करणे), १४० (१) यांसह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

    विशेष पथक स्थापन

    या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले. आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याच्या घटनाक्रमाचा पंचनामा करण्यात आला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण व तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. पन्नासहून अधिक नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले. गुन्ह्याच्या आधी आरोपी आणि पीडितेला पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर नोंदविण्यात आले.

    पीडित मुलीच्या शवविच्छेदन अहवालात आरोपीने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबल्याचे आणि तिच्या शरीरावर जखमा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यासमवेत सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणीस न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे अहवाल, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावेही आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा