• Tue. Sep 22nd, 2026

Pandharpur News : 10 वर्षांचं प्रेम, तरीही वृद्ध महिलेने प्रियकराला का संपवलं? पंढरपूरच्या प्रकरणात मोठा खुलासा

प्रेम प्रकरणात असलेल्या वृद्ध महिलेने आपल्या 70 वर्षीय प्रियकराला संपवल्याची घटना पंढरपूर तालुक्यातून समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याच प्रकरणात आता महत्त्वाचा उलगडा झाला आहे. वृद्ध महिलेने आपल्या प्रियकराला का संपवलं? त्याचं कारण आता समोर आलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सुनेविषयी चुकीचे आणि अपशब्द बोलल्याच्या रागातून 70 वर्षीय प्रियकराचा खून केल्याची कबुली वृद्ध प्रेयसीने पोलीस तपासात दिली आहे. पंढरपूर तालुक्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. डीएनए तपासणीतून ओळख पटताच 68 वर्षीय संशयित प्रेयसी महिलेला अटक करण्यात आली आहे. वृद्ध प्रेयसी सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे. 68 वर्षीय वृद्ध प्रेयसीने 70 वर्षांच्या प्रियकराची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात उघडकीस आली आहे.

हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर रॉकेल ओतून तो पेटवून देण्यात आला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत शेतातील विहिरीत फेकून देण्यात आला होता. अंबादास संतराम खांडेकर (वय ७०, रा. शंकरगाव, ता. पंढरपूर) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर मंगल श्रीमंत होनमाने (वय ६८, रा. शंकरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

सुनेबद्दल वाईट शब्द बोलल्याने काढला काटा

पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव परिसरात 70 वर्षीय अंबादास खांडेकर यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी दीड महिन्यानंतर छडा लावला आहे. अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात 10 वर्षांचे प्रेमसंबंध होते. 27 जुलै रोजी अंबादास हे मंगल यांच्या घरी गेले असता, त्यांनी मंगल यांच्या सुनेबद्दल अपशब्द (वाईट शब्द) वापरले. त्यामुळे मंगल होनमाने हिने खांडेकर यांची हत्या केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.

Maharashtra TimesPune News : डीजे-डॉल्बीचा सर्रास दणदणाट, पोलीस ॲक्शन मोडवर, पुण्यात कठोर कारवाई

अर्धवट जळालेला मृतदेह विहिरीत आढळला होता ; पोलिसांनी असा लावला छडा

पोलिसांच्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी अंबादास खांडेकर यांची हत्या झाल्याचा संशय आहे. त्यानंतर मृतदेह अर्धवट जाळून शेतात टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. 2 ऑगस्ट रोजी शेतातील विहिरीत अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर डीएनए तपासणी करण्यात आली. अंबादास खांडेकर यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने घेऊन त्यांची मृतदेहाशी पडताळणी करण्यात आली. त्यातून मृतदेहाची ओळख पटली.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : गणेश मंडळांनी यंदा मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू नका, विभागीय आयुक्तांनी नेमकं काय आवाहन केलं?ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या 12 तासांत संशयित मंगल होनमाने हिला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सुनेविषयी चुकीचे बोलल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून रागाच्या भरात हत्या केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.