Girl Death Case: मृत बुशराच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहीण, एक मोठी बहीण आणि भाऊ असे कुटुंब आहे. तिचे वडील शहरात ‘इस्टेट ब्रोकर’ म्हणून काम करतात.
२९ वर्षीय तरुणीने इमारतीवरून झोकून दिलं; उच्चशिक्षित तरुणीच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: वडाळा गावाजवळील काद्री एम्पायर इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १६) दुपारी घडली. बुशरा अंजुम शेख असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत मुंबई नाका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेख कुटुंब गेल्या सहा महिन्यांपूर्वीच खडकाळी भागातून काद्री एम्पायरमधील नवव्या मजल्यावरील सदनिकेत भाडेत्त्वाने वास्तव्यास आले होते. बुशरा हिचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून, सध्या तिच्या विवाहासाठी स्थळ पाहण्याचे काम सुरू होते. शनिवारी (दि. १६) दुपारी मुशराने अचानक घरातून खुर्ची आणली आणि बाल्कनीची खिडकी उघडून थेट खाली स्वतःला झोकून दिले. घरात उपस्थित असलेल्या तिच्या वडिलांनी तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, मुशराची ओढणीच त्यांच्या हाती आली आणि ती थेट नवव्या मजल्यावरून खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी धाव घेतली. तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण पोलिस शोधत आहेत.
गच्चीवरून तोल जाऊन एकाचा मृत्यू
एकीकडे तरुणीने जीवन संपवल्याची घटना घडलेली असताना दुसरीकडे नाशिक शहरातील आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नवीन घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी आयोजित केलेल्या वास्तूशांती सोहळ्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. रो-हाउसच्या गच्चीवर फिरत असताना अचानक तोल गेल्याने एका व्यक्तीचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना पंचवटी परिसरातील दिंडोरीरोडवरील ‘संस्कृती रो-हाउस’ येथे घडली. काशिनाथ गौड (वय ५५, रा. मऊ, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे.
काशिनाथ गौड हे नातेवाइकांच्या नवीन घराच्या वास्तूशांतीसाठी नाशिकमध्ये आले होते. गुरुवारी (दि.१४) रात्री वास्तूशांतीचे सर्व विधी झाल्यानंतर काशिनाथ हे रो-हाउसच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. शुक्रवारी (दि.१५) सकाळी पावणेसातच्या सुमारास ते गच्चीवर फिरत असताना अचानक तोल जाऊन ते खाली कोसळले. जावई मदनभाई गौड यांनी त्यांना ‘सिव्हिल’मध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा