ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने याबाबत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. असं असताना राज्यात काही ठिकाणी सर्रासपणे डीजे-डॉल्बीचा दणदणाट बघायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात सातव्या दिवशी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र, विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही ठिकाणी डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी चालक-मालकांवर थेट कारवाई केली.
सांगवी परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या वेळी काही ठिकाणी आवाजाची पातळी तब्बल 120 ते 125 डेसिबलपर्यंत गेल्याची माहिती समोर आली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत 15 हून अधिक डॉल्बी चालक आणि मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ज्या गणेश मंडळांकडून डॉल्बीचा वापर करण्यात आला, त्या मंडळांच्या अध्यक्षांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
Mumbai High Court : सर्वात मोठी बातमी! सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी, मुंबई हायकोर्टाचे निर्देश
डॉल्बी सिस्टमही जप्त
पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून कारवाई थांबवली नाही, तर डॉल्बीचे साउंड सिस्टमही जप्त केले आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील मोठ्या आवाजाच्या डीजे-डॉल्बीवर पोलिसांनी थेट कारवाई करत ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे.
गणपती विसर्जन हा श्रद्धा आणि उत्साहाचा भाग असला, तरी सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावर लक्ष ठेवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.
डीजेच्या दणदणाटावर पोलिसांचा लगाम
सांगवीतील विसर्जन मिरवणुकीत एकीकडे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असताना दुसरीकडे डीजे आणि डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे परिसर दणाणून गेला होता. आवाजाची पातळी 120 ते 125 डेसिबलपर्यंत गेल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित डीजे चालक, मालक आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली.
Chhatrapati Sambhajinagar : गणेश मंडळांनी यंदा मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू नका, विभागीय आयुक्तांनी नेमकं काय आवाहन केलं?या कारवाईमुळे आता गणेशोत्सवातील उत्साह आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उत्सव साजरा करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Baramati Elections : पवार विरुद्ध पवार, संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रीत करणारी निवडणूक, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात काय घडणार?गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत परदेशी पाहुण्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने सांगवीत पाहायला मिळालं. डिजेचा गाण्यावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. गणपती बाप्पाच्या उत्सवाने देशाच्या सीमा ओलांडून परदेशी पाहुण्यांनाही आपलंसं केल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा