• Wed. Jun 10th, 2026
    बारामतीत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, राज्यातला पहिलाच प्रकल्प, ब्रेक टेस्टसह अनेक चाचण्या शक्य

    Contributed by: संतराम घुमटकरEdited by: अनिश बेंद्रे|महाराष्ट्र टाइम्स

    Baramati Vehicle Fitness Centre : वाहनांची ब्रेक टेस्ट, सस्पेन्शन टेस्ट, हेडलाइट अलाइनमेंट, अंडरबॉडी तपासणी, प्रदूषण तपासणी, स्टिअरिंग तपासणी यांसारख्या चाचण्या बारामतीत अत्याधुनिक उपकरणांद्वारे होणार आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    संतराम घुमटकर, बारामती : ‘वाहन फिटनेस’मध्ये तांत्रिक तपासणीत मानवी हस्तक्षेप हद्दपार करून बारामतीत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र ( Automated Testing Station – ATS) सुरू केले आहे. हा प्रकल्प राज्यात प्रथम पथदर्शी आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यात अन्य तीन ठिकाणी अत्याधुनिक ‘स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र’ उभारले जाणार आहे.

    महाराष्ट्रात तीन ठिकाणी एटीएस केंद्रे

    बारामती येथे ‘स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र’ केंद्राचे कामकाज सुरू झाले आहे. या केंद्रामधून वाहनांची फिटनेस तपासणी पूर्णपणे यांत्रिक, डिजिटल आणि संगणकीकृत पद्धतीने केली जात आहे. महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एटीएस केंद्रे उभारली जाणार आहेत. यामध्ये इचलकरंजी, जत, पुणे (आळंदी) असून, इचलकरंजी आणि जत येथे हलक्या व जड वाहनांसाठी तपासणी लेन असतील, तर पुणे (आळंदी) येथे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी स्वतंत्र तपासणी व्यवस्था उभारली जाणार आहे.कंपनीने परिवहन विभागाकडे एक कोटी १४ लाख रुपयांची ‘परफॉर्मन्स बँक गॅरंटी’ दिली असल्याची माहिती येथील व्यवस्थापकांनी दिली आहे. आरटीओ प्रशासनाने हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी कडक धोरणांचा अवलंब केला असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे यांनी ‘मटा’ला दिली.
    Maharashtra TimesDhule Crime : बायकोसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांचा जीव घेतला, लेकीच्या लग्नाचा आनंद विरला

    अधिकार अबाधित

    ‘स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र’ येथे वाहनांचा फिटनेस करण्यापूर्वी ‘आरटीओ’ अधिकारी वाहनाचे हेडलॅम्प संच, मागील दृश्य आरसा, सुरक्षा काच, खिडकी, स्क्रीन, वायपर ब्लेड, डॅशबोर्डवरील उपकरणे, सुरक्षा पट्टा, टायर, रेट्रो-रिफ्लेक्टर टेपचे परीक्षण पाहणी मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे फोटो घेऊन नंतर योग्य असल्यास पुढील तपासणीसाठी केंद्रात पाठवेल. आशा पद्धतीने ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आले आहे.

    Solapur | पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया,सरकारचा एकच धर्म; निवडणुका आणि सत्ता

    या चाचण्या होणार

    वाहनांची ब्रेक टेस्ट , सस्पेन्शन टेस्ट, हेडलाइट अलाइनमेंट, अंडरबॉडी तपासणी, प्रदूषण तपासणी, स्टिअरिंग तपासणी यांसारख्या चाचण्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे होणार आहेत. वाहनांच्या तपासणीचा सर्व डेटा डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहे.

    ‘स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र’ दृष्टिक्षेपात

    – संपूर्ण हायटेक कॅम्पस.
    – खासगी कंपनीकडे पाच वर्षे चालवण्याची जबाबदारी
    – कंपनीने प्रशिक्षित तंत्रज्ञ, सुपरवायझर आणि ऑपरेटर नियुक्त करणे बंधनकारक
    – टेस्ट शेडमध्ये प्रशासन इमारत, पार्किंग, अंतर्गत रस्ते, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, आयटी नेटवर्क, डीजी सेट, यूपीएस, एअर कॉम्प्रेसर, आरओ वॉटर सिस्टीम, ट्रान्सफॉर्मर आणि इतर अत्याधुनिक सुविधा.
    Maharashtra TimesSurya Kant : समाजात काही झुरळांसारखे तरुण; सरन्यायाधीशांची सुनावणीदरम्यान बेरोजगार युवकांशी तुलना, याचिकाकर्त्याला झापलं
    आजपर्यंत वाहन फिटनेस तपासणी ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित होती. या प्रकल्पामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होणार आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि पारदर्शकता वाढेल, असा विश्वास आहे.
    – सुरेंद्र निकम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा