Nashik TCS Case : ‘गुन्ह्यांचा तपास प्रगतिपथावर आहे. संशयितांबाबत सबळ पुरावे संकलित आहेत. आतापर्यंत झालेले युत्तिवाद, पीडितांचे जबाब या प्राथमिक व प्रमुख मुद्द्यावरुन संबंधित संशयितांचे जामीन न्यायालयाने नामंजूर केले आहेत’, असं विशेष सरकारी अजय मिसर यांनी म्हटलं आहे.
चार गुन्ह्यांतील जामीन अर्जांवर
कंपनीतील विविध प्रकरणांबाबत दाखल नऊपैकी तीन गुन्ह्यांत संशयितांनी अद्याप जामिनासाठी धाव घेतलेली नाही. उर्वरित सहा गुन्ह्यांत संशयितांनी जामीन अर्ज सादर केले असून, त्यापैकी चार गुन्ह्यांतील जामीन अर्जांवर शुक्रवारी (दि. 15) अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये संशयित तौसिफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख, कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी यांच्या जामीन अर्जांचा समावेश होता. दरम्यान, बलात्कारासह धर्मांतराच्या प्रयत्नात निदा खान हिच्या जामीन अर्जावर 25 मे, तर त्याच गुन्ह्यातील संशयित दानिश शेख व तौसिफ अत्तार यांच्या जामिनाबाबत 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. यासह तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत गुन्ह्यात संशयित दानिश शेखच्या जामीन अर्जावर 6 जून रोजी सुनावणी होईल.
Dhule Crime : बायकोसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांचा जीव घेतला, लेकीच्या लग्नाचा आनंद विरला
अटक होण्यापूर्वी कॉल
दरम्यान, कंपनीची ‘एजीएम’ अश्विनी चैनानी हिला 10 एप्रिल रोजी पहिल्यांदा न्यायालयात हजर केले होते. चैनानी हिने संशयित दानिश शेख याला अटक होण्यापूर्वी कॉल केल्याचे एसआयटी तपासात स्पष्ट झाले होते. पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर चैनानीचे संशयितासोबत संभाषण झाल्यानंतर काही तासाच दानिशला पोलिसांनी अटक केली होती. पीडितेने विनयभंगाबाबत तक्रार केल्यानंतर तिने पीडितेला उद्देशून ‘तुमको क्या हायलाईट होना है?’ आणि आणि ‘जाने दो, छोड दो’ असे म्हंटले होते. यासह संशयितांसोबत तिचे कॉल्स, कंपनीतील विविध स्वरूपाचे संशयास्पद 78 ई-मेलबाबत पोलिसांनी पुरावे सादर केले आहेत. यासह उर्वरित संशयितांनी केलेले कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे आणि जाणीवपूर्वक केल्याचे निरीक्षण यापूर्वीदेखील न्यायालयाने नोंदवले आहे. त्यांच्याविरुद्धचे पुरावे, पीडितांनी न्यायालयासमोर दिलेले जबाब आणि काही गुन्ह्यांबाबत सुरू असलेला सखोल तपास या मुद्द्यांवरून त्यांचे जामीन फेटाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Mumbai News: मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार; समुद्रातून दोन बोगद्यांनी पाणी आणणार, पहिल्या टप्प्यात २० कोटी लीटर पाणी
उच्च न्यायालयात अर्ज
नाशिक न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे संबंधित संशयितांना आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. त्यासाठी संबंधितांनी अर्ज प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. पुढील आठवड्यात काही जणांचे अर्ज मुंबई उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर सुनावणी सुरू होईल. मात्र, पुढील काही दिवस संशयितांचा मुक्काम नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातच राहणार आहे.
