• Tue. Jun 16th, 2026

    इतिहासातील सर्वात तीव्र ‘एल निनो’चा अंदाज; यंदा जूनमध्ये सक्रिय होणार, संपूर्ण मान्सून हंगामावर परिणाम

    इतिहासातील सर्वात तीव्र ‘एल निनो’चा अंदाज; यंदा जूनमध्ये सक्रिय होणार, संपूर्ण मान्सून हंगामावर परिणाम

    Monsoon Prediction: एल निनोमुळे जागतिक हवामानावर परिणाम होऊन अनेकदा सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि तीव्र उष्णतेची शक्यता निर्माण होते. जूनच्या सुरूवातीलाच एल निनोची परिस्थिती निर्माण होऊन वर्षाअखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मयुरेश प्रभुणे, पुणे: विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान वेगाने वाढत असून, आता जूनमध्येच ‘ एल निनो ‘ची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) वर्तवला आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच एल निनो विकसित होणार असल्याने यंदाच्या संपूर्ण हंगामावर एल निनोचा प्रभाव राहू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

    हिवाळ्यातही सक्रिय राहणार?

    सीपीसीने नुकत्याच जारी केलेल्या अंदाजानुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या असलेली न्यूट्रल स्थिती लवकरच ‘एल निनो’मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. सलग पाचव्या महिन्यात तेथील समुद्रपृष्ठाच्या तापमानात वाढ नोंदली गेली असून, येत्या जूनमध्ये ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आता ८२ टक्के झाली आहे. ही स्थिती पुढेही कायम राहून उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात (डिसेंबर २६ ते फेब्रुवारी २७) एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता ९६ झाली टक्के आहे. एकीकडे देशात मान्सूनचे आगमन होत असतानाच प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय होणे ही बाब हंगामी पावसाच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.Maharashtra TimesMonsoon Update: केरळमध्ये मान्सूनआगमन पाच दिवस आधीच! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

    यंदाचा ‘एल निनो’ इतिहासातील सर्वात तीव्र (समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा ३ अंश किंवा त्यापेक्षाही जास्त) ठरणार असल्याचा अंदाज युरोपीय मॉडेलद्वारे वर्तवण्यात आला होता. मात्र, सीपीसीच्या अंदाजामध्ये ‘एल निनो’च्या तीव्रतेविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. या अंदाजानुसार, नोव्हेंबर- डिसेंबरदरम्यान विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान अधिकाधिक १.५ ते २.० अं शांच्या दरम्यान राहू शकते. जून- जुलैमध्ये क्षीण एल निनो, ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर ऑक्टोबरपासून पुढे तीव्र किंवा अतितीव्र एल निनोची शक्यता अधिक आहे.

    Maharashtra TimesMumbai News: मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार; समुद्रातून दोन बोगद्यांनी पाणी आणणार, पहिल्या टप्प्यात २० कोटी लीटर पाणी

    भारतासह आशियासमोर आव्हान

    • एल निनो सक्रिय असताना प्रशांत महासागरावर कमी दाबाची स्थिती राहून भारतीय उपखंडावरील मोसमी वाऱ्यांचा प्रवाह क्षीण होतो. या भागावरील बाष्पही पूर्वेकडे खेचले गेल्याने मान्सून काळातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहते.
    • भारतात एल निनो पाठोपाठ येणारा २०२७ चा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा राहून उष्णतेच्या लाटांची संख्या वाढण्याची आणि पुढील वर्षीच्या मान्सूनचे आगमन उशिराने होण्याची शक्यता.
    • एल निनोच्या वर्षी २०२७ मध्ये जागतिक पातळीवर विक्रमी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज. सामुद्री जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम शक्य.
    • पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण आलेला असतानाच एल निनोच्या संकटामुळे आशिया खंडाच्या अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसण्याची शक्यता.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा