Nagpur Crime News: नागपुरातील लकडगंज परिसरात प्रेमसंबंधातील वादातून धक्कादायक घटना घडली आहे. प्रियसीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. विशेष म्हणजे तरुणाचा मृतदेह पाहिल्यानंतर धक्क्यात गेलेल्या प्रेयसीनेही हाताची नस कापून स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर :प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर एका तरुणाने थेट टोकाचे पाऊल उचलत व्हिडिओ कॉलवर प्रियसीशी बोलताना गळफास घेऊन स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रियकराच्या मृत्यूची माहिती मिळताच धक्क्यात गेलेल्या तरुणीनेही हाताची नस कापून टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला.
काही दिवसांत दोघांचे लग्न होणार होते
आयुष असे टोकाचं पाऊल उचललेल्या युवकाचे नाव असून तो दाणागंज परिसरात राहत होता. आयुषचे आई-वडील शासकीय सेवेत आहेत. घरचा एकुलता एक असलेला आयुष रेल्वे स्थानकावर हाऊसकिपिंगचे काम करत होता. त्याचे घरासमोर राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीशी मैत्री झाली होती. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचे प्रेमप्रकरण परिसरात चर्चेचा विषय ठरले होते. ही बाब त्यांचा कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी चर्चा करून त्यांच्या नात्याला विरोध केला नाही. काही दिवसांत दोघांचे लग्न करण्याचेही नियोजन सुरू होते.
“मला शेवटचे बघून घे”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयुष आणि तरुणीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. या वादातून आयुष मानसिक तणावात गेला. मंगळवारी त्याने तरुणीला व्हिडिओ कॉल केला. कॉलदरम्यान “मला शेवटचे बघून घे,” असे म्हणत फोन कट केला. त्यानंतर सकाळी त्याची आई त्याला कामावर जायला उठवायला गेली असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर दार उघडून पाहिलं असता त्याने घरात गळफास घेत स्वतःला संपवल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आयुषने मोबाईलमधील काही चॅट्स डिलीट केल्याची माहिती समोर आली असून त्याचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. कोणतीही चिठ्ठी न मिळाल्याने या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, आयुषची बॉडी पाहताच तरुणीचा मानसिक तोल ढासळला. ती घरी गेल्यानंतर तिने चाकूने हाताची नस कापून टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या आईच्या वेळीच लक्षात आल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या उपचारांमुळे तिचा जीव वाचला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा