ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भूमिका मांडली. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला केलेल्या आवाहनावर प्रतिक्रिया दिली. तसेच या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावरही प्रतिक्रिया दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन केलं आहे. यासाठी खासगी वाहनांचा वापर करणे, सोने खरेदी न करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे, वर्क फ्रॉम होम करणे असं आवाहन मोदी यांनी देशाच्या जनतेला केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या भूमिकेवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत जे वक्तव्य केलं ते अयोग्य होतं, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि स्वत: या बैठीकाला हजर राहावं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
“मी विनंती केली, परिस्थिती किती गंभीर आहे, अशावेळेला देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक अनेकदा आपण बोलवतो तशी बैठक बोलवावी. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हजर राहावं. याआधी गेले तीन-चार वर्षांत सर्वपक्षीय बैठका झाल्या. पण त्यापैकी एकाही बैठकाला पंतप्रधान उपस्थित नव्हते. परिस्थिती गंभीर आहे, असंच चालू राहिली तर किती गंभीर परिणाम होतील हे जे पंतप्रधान सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याची तितक्याच गांभीर्याने सर्वांनी नोंद घ्यावी. त्यासाठी त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
“आज मी सकाळपासून टीव्ही पाहतोय. कुणी मोटरसायलवर जात आहे. कुणी आपल्या ऑफिसला चालत जातंय. काही जणांनी तर जाहीर केलं की, मी मंत्री आहे, पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. पूर्वी 17 गाड्या ताफ्यात होत्या. त्यावरुन आता आम्ही 8 गाड्यांवर आलो आहोत. मला तर धक्काच बसला. 17 गाड्या ताफ्यात यापूर्वी नेमक्या कशासाठी होत्या? हे काही मी समजू शकलो नाही. कमी केल्यानंतर त्या गाड्या आठवर आल्या. याचा अर्थ या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे यातून स्पष्ट पाहिजे. पूर्वी अशी स्थिती या देशात झाली नव्हती असं नव्हतं. पण ठिक आहे, एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेची आणखी काळजी करावी, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सर्वांनी या प्रश्नावर सहकार्य करावं”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.
मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा अयोग्य, पवारांची भूमिका
“मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काल आणि आजचं स्टेटमेंट पाहिलं. उदाहरणार्थ राहुल गांधी यांच्याबाबत त्यांनी जे शब्द वापरले ते अयोग्य होते. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. तेही संसदेत आहेत. विरोधी पक्षनेता हे एक संविधानिक पद आहे. हे पद लोकसभेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत टाळली तर लोक आपलं स्टेटमेंट अधिक गांभीर्याने घेतात. ते घ्यावेत अशी अपेक्षा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत खाली येत आहे. ती का येत आहे? ती का येत आहे याचा विचार केला पाहिजे. हे खरं आहे की, इराणचा इशू आहे त्यामुळे त्याचा काहीना काही दुष्परिणाम आहे. पण तेवढाच आहे का? तेवढाच असेल तर मग हा निर्णय युद्ध सुरु झाल्यानंतरच का घेतला नाही? ज्यादिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, त्या दिवसापासून हे सगळे निर्णय घेतले. निवडणुकीची प्रक्रिया चालू होती त्या काळात देशाच्या नेतृत्वाने कधीही या पद्धतीची जनतेत जागरुकता निर्माण करावी, असा विचार आला नाही”, असा टोला शरद पवारांनी लगावला.
“मी काल की परवा बघत होतो. सोमानाथ मंदिराला 75 वर्षे पूर्ण झाले, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. त्याबाबत तक्रार करायचं कारण नाही. पण एअर फोर्सचे सहा विमाने हे वरुन त्या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रश्न असा की, परिस्थिती गंभीर आहे. गांभीर्य सर्वांनी दाखवलं पाहिजे”, असादेखील टोला पवारांनी लगावला.
“मी सोने खरेदी करु नका असं सांगणं याचा अर्थ एकच आहे, आपल्या चलनाची किंमत आहे, ती घसरु द्यायची नाही हा त्यामागचा हेतू आहे. तो चुकीचा आहे, असं मी म्हणत नाही. एका बाजूने आपण हे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला खर्च कमी करण्याकडे दुर्लक्ष करायचं या दोन्ही गोष्टी विरोधी आहेत”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा