• Sat. Jun 13th, 2026
    मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; निदा खानला लपवलं, ते घर महापालिकेकडून सकाळ-सकाळीच जमीनदोस्त

    Mateen Patel House Demolish : ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि दुकाने बेकायदा असल्याचा दावा करत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली होती

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी हिना खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या कौसर पार्क येथील घरावर आणि नारेगाव येथील कार्यालयावर महापालिकेने मंगळवारी २४ तास मुदतीची नोटीस चिटकवली होती. त्यानंतर निदाला पटेलने ज्या घरात लपवलं, त्याच्यावर बुधवारी सकाळीच बुलडोझर चालवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कारवाई करत हे घर जमीनदोस्त केलं.

    मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर महापालिकेने यापूर्वी तीन दिवस मुदतीची नोटीस चिटकवली होती. मालमत्तांची मालकी सिद्ध करणारी व मालमत्ता अधिकृत असल्याची खात्री करणारी कागदपत्रे सादर करा, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. तीन दिवसांची मुदत मंगळवारी संपत असताना मतीन पटेल यांच्याकडून पालिकेला अर्ज सादर करण्यात आला व पंधरा दिवसांची मुदत देण्याची मागणी करण्यात आली. पालिकेने ही मागणी फेटाळली आणि २४ तासांत माहिती सादर करण्याची नोटीस घर आणि कार्यालयावर चिटकवली.
    Maharashtra TimesBhopal Land Deal : महाराष्ट्रासह देशभरातील 50 IAS IPS अधिकाऱ्यांची एकाच दिवशी एकाच ठिकाणी जमीन खरेदी, 16 महिन्यात भाजप सरकारचा मोठा निर्णय, भूखंडाचा दर 60 कोटीपार

    कारवाईला स्थगिती नाही

    ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन मजीद शेख यांचे घर आणि दुकाने बेकायदा असल्याचा दावा करून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली होती. त्याच्या विरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीत कारवाईला खंडपीठाने स्थगिती दिली नाही. मात्र कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची हमी महापालिकेतर्फे देण्यात आली होती.

    Chandrashekhar Bawankule | स्वदेशीचा नारा स्विकारलाय आता गांधींवर टीका करणार का? बावनकुळेंचा सवाल

    निदा खानला आश्रय

    नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणानंतर महापालिकच्या अतिक्रमण विभागाने एमआयएमचे नगरसेवक मतीन मजीद शेख यांचे नारेगाव येथील बिस्मिल्ला कॉलनीतील बांधकाम बेकायदा असल्याचे नमूद करून, नोटीस चिकटवली होती. त्याला मतीन यांनी ॲड. अभयसिंह भोसले यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे होते. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली.

    Nida Khan Mateen Patel House Bulldozer  Maharashtra Times (2)

    Maharashtra TimesPrateek Yadav : भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्या पतीचे निधन, वयाच्या 38 व्या वर्षी प्रतीक यादव यांचा अकस्मात मृत्यू

    मतीन पटेलचा कांगावा

    नोटिशीला उत्तर देण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. ही नोटीस कायदेशीर प्रक्रियेचा भंग करणारी आहे. राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठरावीक हेतू ठेवता येणार नाही. अतिक्रमणाची नेमकी माहिती दिली पाहिजे; तसेच कलम २६० नुसार नोटीस देताना सात दिवसांचा वेळ देणे आवश्यक असल्याचे मुद्दे ॲड. भोसले यांनी उपस्थित केले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा