Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! राज्यात उष्णतेच्या नव्या लाटेची शक्यता; दिवसाप्रमाणे रात्रीही उकाडा वाढणार
कोकण विभाग वगळता उर्वरित राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा अद्ययावत करण्यात आला. बुधवारपासून दमट वातावरणामुळे होणारा त्रास कमी होईल अशी शक्यता आहे. मात्र, कमाल तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढउतार होत राहतील, अशीही शक्यता आहे.
