• Sun. Jun 14th, 2026

    ‘मिठागर, खारफुटी, जलस्रोत नष्ट होणार’; तिसरी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    ‘मिठागर, खारफुटी, जलस्रोत नष्ट होणार’; तिसरी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    Navi Mumbai News: तिसऱ्या मुंबई प्रकल्पाचं काम सुरू होण्यापूर्वीच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कायद्यांचे उल्लंघन आणि पर्यावरणीय धोक्याचा आरोप केला जात असून, एमएमआरडीए विरोधात थेट मुख्यमंत्र्‍यांकडे तक्रार केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: पनवेल, उरण आणि पेण तालुक्यात ‘एमएमआरडीए’मार्फत प्रस्तावित असलेल्या नवनगर अर्थात तिसरी मुंबई या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पामध्ये कायदेशीर तरतुदींचे सर्रास उल्लंघन, पुनर्वसनातील त्रुटी आणि प्रशासकीय स्तरावर मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे.

    नेमके काय आहेत आरोप?

    तक्रारदाराच्या मते, सदर प्रकल्प राबविताना ‘भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायदा २०१३’, ‘पर्यावरण संरक्षण कायदा १९८६’ आणि ‘एमआरटीपी’ कायद्यातील सक्तीच्या तरतुदींचे पालन करण्यात आलेले नाही. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जनसुनावणी, सामाजिक परिणाम मूल्यांकन (एसआयए) आणि पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पातील सर्वांत मोठा धोका पर्यावरणाला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.Maharashtra TimesMaharashtra Weather: सूर्य आग ओकणार! राज्यात उष्णतेच्या नव्या लाटेची शक्यता; दिवसाप्रमाणे रात्रीही उकाडा वाढणार

    प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मिठागर जमिनींचा समावेश असून, या जमिनी सीआरझेड १बी क्षेत्रात येतात. मिठागरे ही पुरापासून संरक्षण करणारी नैसर्गिक भिंत मानली जातात; त्यामुळे येथे बांधकाम झाल्यास भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच खारफुटी आणि जलस्रोत नष्ट होऊन जैवविविधतेचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.

    प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी, मच्छिमार, मिठागर कामगार, आदिवासी आणि १२ बलुतेदार यांच्यासाठी कोणतेही सर्वसमावेशक पुनर्वसन धोरण जाहीर करण्यात आलेले नाही. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या धर्तीवर देऊ केलेला २२.५ टक्के विकसित भूखंडाचा प्रस्ताव हा बाजारमूल्याच्या तुलनेत अत्यंत अपुरा आणि अन्यायकारक असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

    Maharashtra TimesMumbai Local: मुसळधार पावसातही लोकल धावती राहणार! रेल्वे स्थानकांवर कामं सुरू; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर होणार

    तक्रारीमध्ये शासकीय अधिकारी आणि काही राजकीय घटकांच्या हितसंबंधांबाबतही संशय व्यक्त करण्यात आला असून, ही बाब महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार गैरप्रशासन या प्रकारात मोडते, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण व्यवस्था याबाबत कोणतीही ठोस तरतूद दिसून येत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    प्रमुख मागण्या

    • या संपूर्ण प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयामार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी
    • प्रकल्पास त्वरित स्थगिती देऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पुन्हा राबवाव्यात
    • सर्व बाधित घटकांसाठी कायद्यानुसार योग्य मोबदला आणि पुनर्वसन निश्चित करावे
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा