• Sat. Jun 13th, 2026
    Nashik Paper Leak : कपडे बदलले, टक्कल केलं, तरीही पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? NEET पेपरफुटी प्रकरणात नांदगावचा तरुण ताब्यात

    Nashik NEET Exam Paper Leak Suspected Accused in Custody : NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली.

    नाशिक पेपरफुटी संशयित आरोपी शुभम खैरनार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : देशातील 22 लाख 39 हजार विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचं भविष्य ठरवणारी यंदाची नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. NTA म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे आता, या पेपरफुटीचे धागेदोरे नाशिकमधून समोर आले आहेत. नीट परीक्षेचा पहिला पेपर हा नाशिकमध्ये फुटला असून, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

    पोलिसांनी काय माहिती दिली?

    NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमधून समोर आली. नाशिकमधील ही लीक झालेली प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात नाशिकमधील नांदगावच्या 30 वर्षीय संशयित शुभम खैरनारला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिक पोलीस म्हणाले की, ‘देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील नाशिकमधून शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं, त्यानुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. तो BAMSच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. नाशिकमध्ये तो शिकायला होता. आमच्याकडून राजस्थान पोलिसांना सहकार्य करण्यात येत आहे. CBI कडून याप्रकरणी तपास सुरू आहे. नाशिक गुन्हे शाखा 2 ने ही कारवाई केली आहे. संशयित आरोपी हा मूळ नांदगावचा आहे’, असं महत्त्वपूर्ण माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
    Maharashtra TimesNashik NEET Paper Leak : NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन, पहिली कॉपी नाशकात, एकजण ताब्यात; मास्टरमाईंड कोण?

    कपडे बदलले होते, संपूर्ण केस काढले

    पोलीस पुढे म्हणाले की, ‘आम्हाला नाव मिळालं होतं पण पत्ता आणि अधिक माहिती नव्हती. काही प्रमाणात तांत्रिक माहिती मिळवली आणि आम्ही शोध सुरु केला. त्याने त्याचे कपडे बदलले होते, संपूर्ण केस काढून टाकले होते. शुभम खैरनार देवाच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस अंमलदारांनी त्याला ओळखलं, त्याची चौकशी केली त्यांनंतर ते निष्पन्न झालं. एक तासाच्या आता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार नाशिकमधून नीटचा पेपर व्हाया हरियाणातून राजस्थानमध्ये पोहोचला होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा