Maharashtra Latest News: निदा खानला नाशिकरोड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. विशेष तपास पथकाने पुरावे गोळा केले असून, दोषारोपपत्र लवकरच दाखल होणार आहे. इतर आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत. एमआयएम नगरसेवकाला नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीतील विविध प्रकरणांबाबत दाखल नऊपैकी दोन गुन्ह्यांत संशयितांनी अद्याप जामीनासाठी धाव घेतलेली नाही. दरम्यान, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबई महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. येत्या शुक्रवारपासून (१५ मे) दहा टक्के पाणीकपात लागू केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही महापालिकेने मुंबईकरांना केले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर
