• Tue. Jun 16th, 2026
    Rohit Pawar: आरोपांचा अहवाल जाहीर करा! MMRDAबाबत आमदार रोहित पवार यांची मागणी

    Rohit Pawar: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशीचे निर्देश दिले होते. हा अहवाल अद्याप जाहीर न केल्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला.

    रोहित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी सल्लागार नेमलेल्या ‘सीस्रा’ या कंपनीने ‘एमएमआरडीए’वर केलेल्या आरोपांविषयीचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या आरोपांप्रश्नी एका महिन्यात चौकशी अहवाल देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी २०२५मध्ये दिले होते. मात्र, अहवाल आला नसल्याचे पवार म्हणाले.

    फ्रान्सच्या ‘सीस्त्रा’ या कंपनीने २०२५मध्ये दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात एमएमआरडीए प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर या कंपनीने मवाळ भूमिका घेत, आरोप मागे घेतले होते. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले होते.

    Maharashtra TimesStuti Sonawane : 24 वर्षीय डॉ स्तुती सोनवणे मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, 60 वर्षीय डेंटल सर्जन तिच्यासाठी पितृतुल्य, कोर्टाकडून अटकपूर्व जामीन
    ‘हा केवळ एमएमआरडीएचा नाही; तर राज्याच्या प्रतिमेचा विषय आहे. त्यामुळे हा अहवाल सार्वजनिक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि या अहवालाची प्रत देण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली असून येत्या अधिवेशनात यावर विधिमंडळात आवाज उठवणार आहे,’ असेही रोहित पवार यांनी अधोरेखित केले.

    Maharashtra TimesMother’s Day 2026 : ‘आपण मोठे होत जातो अन् आई…’, महाराष्ट्राचे दिग्गज नेतेमंडळी जेव्हा मातृदिनी हळवी होतात
    खरात प्रकरणी आर्थिक व्यवहार
    नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असून त्यातील एक टक्का सत्यदेखील समोर आलेले नाही. इतिहासातील सर्वांत काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंदवले जाणार आहे. या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा